आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Filmy Style Fetal Bmw Accident In Ludhiana Punjab

फिल्मी स्टाइलमध्ये झाला BMW चा अॅक्सिडंट, कार तीन वेळा उलटली नंतर झाली चक्काचुर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना (पंजाब)- अतिघाई संकटात नेई, असे जे म्हटले जाते त्याची प्रचिती या शहरात आली. जगराओजवळ असलेल्या अलीगड परिसरात रस्ता दुभाजकाला धडकल्याने ओव्हरस्पिड बीएमडब्ल्यू कार अगदी चक्काचुर झाली. सुदैवाने कारमध्ये बसलेल्या दोन्ही युवकांचे प्राण वाचले. हे दोन्ही युवक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गौतम आणि पियुष अशी जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत. रात्रीच्या सुमारास ते भरधाव वेगाने गाडी चालवत होते. या दरम्यान चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी रस्ता दुभाजकावर जोरदार आदळली. यात गाडीचे खुप नुकसान झाले. गाडीतील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरात लोक अपघात स्थळी जमा झाले. त्यांनी जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले.
पुढील स्लाईडवर बघा, या अपघातात गाडीचे कसे झाले नुकसान...गाडी झाली चक्काचुर...