आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Groom Commits Suicide By Jumping In Canal During Barat

मळमळ होत असल्याचे सांगून गाडीखाली उतरला नवरदेव, कॅनलमध्ये मारली उडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड (पंजाब)- लुधियाना शहरातील मॉडेल टाऊनमध्ये वरात घेऊन जात असलेल्या नवरदेवाने कॅनलमध्ये उडी मारुन आत्महत्या केली. मळमळ होत असल्याचे सांगून त्याने लग्नासाठी सजवलेली गाडी थांबवली. त्यानंतर लगेच पाण्याने काठोकाठ भरलेल्या कॅनलमध्ये उडी मारली. यावेळी प्रचंड गोंधळ उडाला. कॅनल तुडुंब भरुन वाहत असल्याने त्याला वाचवण्यासाठी कोणीही समोर आले नाही. त्याने टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती मात्र मिळालेली नाही.
उडी मारण्यापूर्वी काढली पगडी आणि शेरवानी
- 24 वर्षीय नवरदेवाचे नाव मोहित आहे. काल त्याचे लग्न होणार होते. त्यासाठी वरात मोठ्या धुमधडाक्यात निघाली होती.
- दुगरी येथील सिंघ्वा कॅनलजवळ वरात आली होती. ढोलताशांचा जल्लोष करण्यात येत होता. वरातीतील काही जण नाचत होते.
- यावेळी मोहित म्हणाला, की त्याला मळमळ होत आहे. त्याने सजवलेली गाडी थांबवायला लावली.
- त्याने पगडी आणि शेरवानी कारमध्येच काढली. त्यानंतर धावत जाऊन कॅनलमध्ये उडी मारली.
- या घटनेने वरातीतील लोक प्रचंड घाबरले. त्यांनी मोहितला वाचवण्याचा प्रयत्न केला.
- पण कॅनल पाण्याने भरुन वाहत असल्याने त्याला वाचवता आले नाही.
लग्न मंडपापासून 500 मीटर अंतरावर घडली घटना
- मोहितने आत्महत्या केली त्या स्थळापासून लग्नमंडप केवळ 500 मीटर दूर अंतरावर आहे. मोहितने असे का केले याची माहिती मिळालेली नाही.
- पाणबुड्यांनी मोहितचा मृतदेह बाहेर काढला.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, अशी धुमधडाक्यात निघाली होती वरात.... घरी पसरला शुकशुकाट....