आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Husband Commits Suicide As Forth Wife Ran Away With Lover

चार लग्न केले या कॉंग्रेस नेत्याने, प्रियकरासोबत चौथी पत्नी पळाल्याने स्वतःवर झाडल्या गोळ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधर (पंजाब)- कॉंग्रेस नेते सुभाष चंद्र यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. चौथी पत्नी मनिषा प्रियकरासोबत पळून गेल्याने त्यांनी हे पाऊल उचलले. त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे. पोलिसांनी रात्री उशीरा मनिषाला अटक केली.
पंजाब प्रदेश कॉंग्रेस कमेठीच्या अल्पसंख्याक सेलचे सुभाष चंद्र डेप्युटी चेअरमन होते. पहिली पत्नी रेखासोबत त्यांचा दहा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले. ही पत्नीही काही वर्षांत सोडून गेली. त्यानंतर सुभाष यांनी तारा नावाच्या तरुणीसोबत लग्न केले. त्यांना मुलगा झाला. हा मुलगा आता पाच वर्षांचा आहे.
परंतु, दोघांचेही पटले नाही. तरीही तारा सुभाषसोबत राहत होती. त्यानंतर सुमारे चार वर्षांपूर्वी सुभाष यांनी मनिषासोबत लग्न केले. दोघांना दोन वर्षांचा मुलगा आहे. त्याचे नाव युवराज आहे. सुभाष यांचे पहिले तीन लग्न अरेंज तर चौथे लव्ह प्रकरणातून झाले होते.
तारा आणि मनिषा सुभाष यांच्यासोबत राहत होत्या. परंतु, मनिषाचे राज नावाच्या एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी राज आणि मनिषा पळून गेले. त्यानंतर सुभाष फार अस्वस्थ राहत होते. त्यांनी काल रात्रीच्या सुमारास गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे, की मनिषाने मला धोका दिला. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे.
पत्नीचा प्रेमी धमकी द्यायचा, वाचा सुसाईड नोट
मी सुभाष चंद्र. माझ्या वडीलांचे नाव धर्मपाल आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मी हे पत्र लिहित आहे. माझी पत्नी मनिषा ऊर्फ मुन्नीने मला धोका दिला. मनिषाचे राज नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध आहेत. राज आणि माझी सासू सीता या दोघांनी माझे घर बर्बाद केले. चार वर्षांपूर्वी आम्ही प्रेमविवाह केला. आता आम्हाला दोन वर्षांचा मुलगाही आहे. मनिषा यापूर्वी दोनदा घरुन पळाली आहे. आताही काही कारण न देता ती घरुन पळून गेली. तिने माझ्याविरुद्ध तक्रार दिली आहे. पोलिसांनी मला दोन दिवसांचा अवधी दिला आहे. पण मनिषा आणि तिच्या आईला राजने दूर पाठविले आहे. माझी काही चूक नाही. तरीही मनिषाने मला धोका दिला. मी अनेकदा समजावले तरी ती माझे ऐकत नाही. राजने मला धमकी दिली आहे, की जर मी मनिषाला सोडले नाही तर माझ्या कुटुंबीयांना ठार मारेल. ही पिस्तुल मला कॅरी पुलावर सापडली होती. मी जीव देत आहे. माझ्या कुटुंबीयांचा काही दोष नाही.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या घटनेशी संबंधित फोटो....