आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद्यांकडून काळ्या विंचवाला मागणी; सोशल साईटवरून केला जातो तस्‍करांशी संपर्क

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विष तयार करण्‍यासाठी दहशतवाद्यांकडून काळ्या विंचवला मोठ्या प्रमाणात मागणी असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. रविवारी पंजाबमध्‍ये फिरोजपूर पोलिसांनी विंचवाची तस्‍करी करणा-या टोळीला ताब्यात घेतल्‍यानंतर ही घटना उघडकीस आली. आरोपींनी याबाबाद न्‍यायालयात खुलासा केला आहे. यावेळी तस्‍करांनी सांगितले की, सोन्‍यापेक्षाही जास्‍त महाग काळे विंचू विकले जातात. दहशतवादी विष तयार करण्‍यासाठी काळ्या विंचवाचा वापर करत असल्‍याची माहिती त्‍यांनी यावेळी दिली.
का आहे काळ्या विंचवाला मागणी-
काळा विंचू विषारी असल्‍यामुळे दहशतवादी संघटनेकडून सर्वात जास्‍त मागणी केली जाते. विंचवाच्‍या विषापासून सायनाइड सारखे विष तयार केले जाते. कॅप्‍सूलमध्‍ये भरून दहशतवादी संघटनेकडे पाठवले जाते. जर कोणी पकडला गेला तर स्‍वत:ला संपवण्‍याठी या कॅप्‍सूलचा वापर केला जातो.
विंचवाची बाजारातील किंमत-
काळे आणि पिवळे विंचू सर्वाज जास्‍त विषारी असतात. हे विषारी विंचू कराची, लाहोर आणि इस्‍लामाबादच्‍या वाळवंटी प्रदेशामध्‍ये सापडतात. 200 ग्रॉम विंचवाची किमंत 1 अब्‍ज ते 5 अब्‍ज रूपयांपर्यत असल्‍याचे सांगण्‍यात आले. एका विचंवाचे वजन 50 ते 100 ग्रँम असते.
पुढील स्‍लाईडवर वाचा विंचवाच्‍या तस्‍करी विषयी...