आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालियनवाला बाग हत्‍याकांड: ब्रिटिश सैनिकांच्‍या 1650 फैरी आणि मृत्‍यूचे तांडव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताला इंग्रजांच्‍या जोखडातून मुक्‍त करण्‍यासाठी अनेक तरूणांनी क्रांतिच्‍या यज्ञात प्राणाची आहूती दिली. अनेक मातांनी मुलगा गमवला तर अनेक स्‍त्रीया विधवा झाल्‍या. मात्र देश स्‍वातंत्र झाला पाहिजे या उद्देशासाठी देशभरातून विविध मार्गाने अनेक लोक स्‍वतंत्र्याच्‍या लढ्यात भाग घेत होती. इंग्रजांच्‍या विरोधात बंड करण्‍यासाठी आणि रॉलट कायद्याला विरोध करण्‍यासाठी जालियनवाला बागेत सभेचे आयोजन करण्‍यात आले होते. ही सभा उधळून लावण्‍यासाठी ब्रिटिश अधिकारी जनरल जेनीनॉल्‍ड डायरने गोळीबार करण्‍याचा आदेश दिला. या गोळीबारत 10 मिनिटात 1650 फैरी झाडण्‍यात आल्‍या.
कधी झाला गोळीबार-
13 एप्रिल 1919 ब्रिटिश अधिकारच्‍या आदेशावरून हा गोळीबार करण्‍यात आला. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरोधात सभेसाठी सुमारे 15 ते 20 हजार नागरिक जालियनवाला बागेत जमले होते. शांततेने आंदोलन करणाºया या नागरिकांमध्ये महिला, मुलेही होती. त्याच वेळी ब्रिगेडियर जनरल रेगिनाल्ड ई. एच. डायर याने गोळ्या घालण्याचे आदेश दिले. 50 सैनिकांनी 1650 फैरी झाडल्या. यामध्ये 1 हजार भारतीय शहीद झाले. 1100 जखमी झाले होते.
टीप- 19 ते 25 नोव्‍हेंबर 'जागतीक ऐतिहासीक वारसा सप्‍ताह' म्‍हणून साजरा केला जात आहे. या निमित्ताने आज आम्‍ही तुम्‍हाला भारतीय इतिहासातील काही महत्त्वाच्‍या वास्‍तूंची आणि घटनांची माहिती देणार आहोत. भारत देशात असे अनेक गड-किल्ले, राजवाडे, मकबरा, महाल आहेत, यांना जागतिक महत्त्व प्राप्‍त झाले आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा जालियनवाला बागेची ऐतिहासीक फोटो...