आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Livestock National Championships In Fazilka At Punjab

चॅम्पियन राणीने स्‍पर्धेत एका वेळेस दिले 26.335 किलो दूध, 90 लाख रुपयांची ऑफर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - मुक्तसरमध्ये आयोजित आठव्या नॅशनल लाइव्हस्टॉक चॅम्पियनशिपमध्ये फाजिल्का जिल्ह्याच्या चक्क वेरका गावातील शेरबाज सिंह यांच्या "राणी'ला प्रसिद्ध जातींच्या म्हशींच्या तुलनेत विजेतेपद मिळाले आहे. राणीने एका वेळेस २६.३३५ किलो दूध देऊन पहिला क्रमांक पटकावला आणि तिने भारतीय विक्रमही मोडीत काढला. राणीच्या या यशामुळे तिला ९० लाख रुपयांत खरेदी करण्याची ऑफरही आली, मात्र मालक शेरबाज सिंह यांनी ती धुडकावून लावली.
हीटरसोबत स्पेशल डाएटचीही काळजी : मालक शेरबाज सिंह म्हणाले, या म्हशींना प्रत्येक प्रकारची सुविधा दिली जाते. शेतात त्यांच्यासाठी स्वतंत्र हीटर लावले आहे. याशिवाय दरराेज तीन ते चार किमी फिरवून आणले जाते व मालीशही केली जाते. त्यांना गोठ्यात कधीही बांधून ठेवले जात नाही. त्यांचा आहार भिन्न आहे. त्यांना विशिष्ट प्रकारचा खुराक दिला जातो. सोयाबीन, हरभरा, मीठ, कॅल्शियम, मोहरी, जवस, व्हिटॅमिन-एच, शेंगदाणे, गहू, मका, तांदूळ यांचे मिश्रण करून त्यांना खाऊ घातले जाते.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो..