आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच महिन्यांच्या मुलीला जन्मदात्या आईने भोसकले, पाठित चार इंच आत गेला चाकू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पटियाला (पंजाब)- एका जन्मदात्या आईने धारधार चाकूने भोसकून स्वतःच्या चिमुकलीला गंभीररीत्या जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चिमुकलीचे नाव फेरु असे आहे. तिच्या शरीरात चार इंच आत गेलेला चाकू डॉक्टरांनी कठोर परिश्रम घेऊन बाहेर काढला. चिमुकलीची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या वडीलांच्या सांगण्यावरुन पोलिसांनी आईविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
पोलिस उपनिरिक्षक गुरनामसिंग यांनी सांगितले, की सध्या चिमुकलीच्या आईविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. आई मानसिक अस्थिर असल्याचे तिच्या वडीलांनी सांगितले आहे. चिमुकलीला चाकू मारण्यामागे हेच कारण असू शकते. तिला आम्ही अटक करणार आहोत. त्यानंतर चाकू कुणी मारला हे स्पष्ट होईल. घटना घडली तेव्हा चिमुकलीची मोठी बहिण घरी होती. तिची बहिण तिच्यापेक्षा केवळ दोन वर्षांनी मोठी आहे.

पुढील स्लाईडवर वाचा, चार इंच शरीरात गेला होता चाकू... अशी घडली घटना...