आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pathankot Sculptures Tells The Story Of The Mughal Atrocities

PIX: येथील पुतळे सांगतात 18 व्या शतकातील मुघल अत्याचारांची करुण कहानी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गुरुद्वारा अकालगड साहेबच्या गेटसमोर मुघलांचे अत्याचार सांगणारे पुतळे.)
पठाणकोट (पंजाब)- पठाणकोट-घरोटा मार्गावरील गुरुद्वारा अकालगड साहेबच्या गेट बाहेर आणि आत 18 व्या शतकात मुघल शासकांनी शीखांवर केलेल्या अत्याचारांचे पुतळे लावण्यात आले आहेत. शीखांनी धर्मांतरण करावे यासाठी मुघलांनी कशा यातना दिल्या याची माहिती आताच्या पिढीला मिळावी यासाठी बाबा बसंतसिंग आणि अकालगड साहेब सेवा ट्रस्टने मोहिम राबवली आहे.
शीख आणि हिंदू धर्माची रक्षा करणाऱ्या शीख नेत्यांवर मुघल शासकांनी कसे अत्याचार केले, हे या पुतळ्यांच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. बाबा बसंतसिंग सांगतात, की इतिहासातून माहिती घेण्याऐवजी नवीन पिढी सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती मिळवत आहे. यामुळे 21 सदस्यांची समिती स्थापन करुन पुतळ्यांच्या माध्यमातून जनजागरण करण्यास सुरवात करण्यात केली आहे.
पुढील स्लाईडवर बघा, मुघल शासकांनी शीख आणि हिंदूंवर केलेले अनन्वीत अत्याचार पुतळ्यांच्या माध्यमातून....