पठानकोट(पंजाब) - येथे एका सरसत्याच्या वळणावर ट्रक आणि अॅक्टिव्हाची धडक झाली. यात अॅक्टीवावर असलेली महिला पोलिस कॉन्स्टेबल गंभीररित्या जखमी झाली. यानंतर तेथील मानसांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर तिला रुग्नालयात नेण्यात आले.
महिला कॉन्स्टेबलच्या जबाबाकडे सर्वांचेच लक्ष...
- पठानकोट येथील एसएसपी ऑफिसमध्ये नीलम महिला कांस्टेबल पदावर रुजू आहे.
- निलम काही कामानिमित्त बाहेर जात होती.
- चालकाने अचानकपणे ट्रक वळवल्याने गाडी थेट ट्रकखाली गेली आणि निलम जखमी झाली.
- स्थानिक लोकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तेथे येऊन तिला रुग्नालयात भर्ती केले.
ट्रक ड्रायव्हर फरार...
- पोलिसांनी सांगितल्यानुसार निलमकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पुढील कारवाई
करण्यात येईल.
- या घटनेनंतर ट्रकचालक तत्काळ तेथून फरार झाला त्याचा शोध घेणे सुरू आहे.
- पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन शोध घेण्यास सुरुवात केल आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, जखमी महिला पोलिस कर्मचाऱ्याचे Photos....