आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त शांततेचे समर्थन नको, दहशतवादाच्या विरोधात कठोर कारवाईही आवश्यक : मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर : दहशतवादाला पराभूत करण्यासाठी मजबूत इच्छाशक्ती दाखवायला हवी, फक्त शांततेचे समर्थन करून चालणार नाही. दहशतवादाच्या विरोधात कठोर कारवाईही करावी लागेल, असे मत हार्ट ऑफ आशिया परिषदेच्या दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

हार्ट ऑफ आशिया परिषदेत भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान यांच्याव्यतिरिक्त दक्षिण आणि मध्य आशियातील ३० देशांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज अजिज आले आहेत.

दहशतवादाबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जे दहशतवादाला आर्थिक मदत आणि पाठिंबा देत आहेत त्यांच्यावरही कठोर कारवाई होण्याची गरज आहे. मोदी म्हणाले की, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी अफगाणिस्तानला एक अब्ज डॉलरची अतिरिक्त मदत दिली जात आहे.त्याचा उपयोग पाणी व्यवस्थापन, आरोग्य, पायाभूत विकास, ऊर्जा आणि कौशल्य विकास यासह विविध क्षेत्रांसाठी होईल.
‘एका देशाला जबाबदार ठरवू नका’
परिषदेत भारत आणि अफगाणिस्तानने एका स्वरात सीमापार दहशतवाद बंद करण्याचे आवाहन केले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी अप्रत्यक्षपणे दहशतवादाबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल पाकिस्तानचे सरताज अजिज यांना,एका देशाला दहशतवादासाठी जबाबदार ठरवू नका, असे वेगळे वक्तव्य जारी करावे लागले. ते म्हणाले की, अफगाणिस्तानमध्ये शांततेसाठी पाकिस्तान तत्पर आहे.
५० कोटींची रक्कम दहशतवाद संपवण्यासाठी खर्च करा : घनी
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी दहशतवादाचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत राहिला. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी पाकिस्तानवर अघोषित युद्ध पुकारल्याचा थेट आरोप केला. ते म्हणाले की, अफगाणिस्तानची गरिबी दूर करण्यासाठी दिलेली ५० कोटी रुपयांची रक्कम पाकिस्तानने दहशतवाद संपवण्यासाठी खर्च करावी.
मोदी यांनीही दहशतवादाचे समर्थन करणाऱ्यांवर कारवाईचा मुद्दा मांडला. परिषदेत पाकिस्तान पूर्णपणे एकाकी पडला. गनी म्हणाले की, पाकिस्तानने दहशतवादाचे समर्थन केले नाही तर आम्ही अफगाणिस्तानमध्ये एक दिवसही टिकू शकणार नाही, असे वक्तव्य एका दहशतवादी नेत्याने केले होते. घनी यांच्या भाषणादरम्यान सरताज अजिज यांचा चेहरा उतरला होता.
बातम्या आणखी आहेत...