आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parent Allegedly Beat Up School Director Inside The Cabin

VIDEO: मुलीसाठी आईने शाळेच्या डायरेक्टरला केबिनमध्ये केली मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधर (पंजाब)- येथील मेयर वर्ल्ड स्कूलच्या महिला डायरेक्टरला मुलीच्या आईने केबिनमध्ये घुसून मारहाण केल्याची प्रकरण उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या केबिनमध्ये सीसीटीव्ही असल्याने या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग समोर आले आहे. या प्रकरणी मुलीच्या आईविरुद्ध पोलिस तक्रार देण्यात आली आहे.
या महिलेचे नाव तरनजीत कौर असे आहे. त्यांनी मारहाण केलेल्या डायरेक्टरचे नाव ज्योती नागराणी आहे. ज्योती यांनी तरनजीत यांच्या मुलीचा मोबाईल फोन जप्त केला होता. यामुळे संतप्त झालेल्या तरनजीत यांनी केबिनमध्ये घुसून ज्योती यांना मारहाण केली. त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. यातून सुटका करुन घेण्यासाठी ज्योती केबिनच्या दाराकडे पळत गेल्या. तेव्हा तरनजीत यांनी त्यांना पकडून ठेवले. जमिनीवर ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यांना सॅंडलने मारण्याचा प्रयत्न केला.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या घटनेचा व्हिडिओ... आणि फोटो...