आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरबेसमध्‍ये सुरू होते स्‍फोट, आजी म्‍हणाली: बेटा रडू नको हे फटाक्‍यांचे आवाज आहेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पठाणकोट- पठाणकोट एअरबेसवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्यामुळे लोकांमध्‍ये असलेली प्रचंड दहशत पाहायला मिळत आहे. ऑपरेशनदरम्‍यान परिसरात स्‍फोटांच्‍या आवाजांनी भीती पसरवली होती. त्‍यामुळे एक चिमुरडी रडत होती. तेव्‍हा, हे फटाक्‍यांचे आवाज आहेत असे सांगून तिच्‍या आजीने तिला शांत केले.
मुलं विचारतात केव्‍हा थांबतील बंदुकांचे आवाज...
भास्कर टीमने मंगळवारी एअरफोर्स सिमेलगतच्‍या परिसरात भेट दिली, तेव्‍हा लोकांच्‍या मनातील दहशत बाहेर आली. या परिसरातील लहान मुले त्‍यांच्‍या पालकांना विचारत होते की, हे बंदुकांचे आवाज केव्‍हा बंद होणार आहेत. लोकांनी सांगितले, एअरफोर्समध्ये स्टेशनच्‍या आत दिवस, रात्र होणा-या ग्रेनेड स्‍फोटांच्‍या आवाजामुळे मुलं रडत आहेत.
घरात थांबणेही कठीण...
- परिसरातील कमल चौधरी यांनी म्‍हटले की, दहशतवादी हल्‍ला पुन्‍हा होऊ नये याची सुरक्षा पथक काळजी घेत आहेत.
- दहशतीमुळे घरात थांबायलाही जीव घाबरतो.
- सीमा भागात डगडा बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे.
आता एअरबेसवर काय स्थिती
- कॉम्बिंग ऑपरेशन सुरु आहे. सर्च ऑपरेशन संपले आहे.
- मंगळवारी संरक्षण मंत्र्यांनी कॉम्बिंग ऑपरेशन अजून चार दिवस सुरु राहाण्याची शक्यता वर्तवली.
- 6 दहशतवादी ठार झाले तर 7 जवान शहीद झाले.