आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • PM Narendra Modi Will Launch Chandigarh International Airport

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: चंदिगडमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ, मोदी करणार उद्घाटन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विमानतळावर चेक इन करण्यासाठी एकूण 48 काऊंटर उभारण्यात आले आहेत. - Divya Marathi
विमानतळावर चेक इन करण्यासाठी एकूण 48 काऊंटर उभारण्यात आले आहेत.
चंदिगड (पंजाब)- चंदिगड आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 सप्टेंबर रोजी करणार आहेत. निर्धारित अवधीपेक्षा 10 दिवस आधी प्रवाशांसाठी खुले होणारे हे देशातील पहिले विमानतळ आहे. या विमानतळासाठी एअरफोर्सचा रनवे वापरण्यात आला असून हे देशातील पहिले ग्रीस विमानतळ आहे. या विमानतळाच्या बांधकामात फ्लाय अॅशपासून तयार केलेल्या विटांचा वापर करण्यात आला आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातून उद्घाटनाची तारिख न मिळाल्याने गेल्या तीन महिन्यांपासून हे विमानतळ बंद होते.
प्रवाशांना मिळणार शुद्ध हवा
या विमानतळावर स्कायलाईट प्लेट्स बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सूर्याची ऊर्जा वापरुन इमारतीत प्रकाशयोजना करण्यात आली आहे. या इमारतीच्या आतील भाग हिरवागार आहे. या विमानतळाच्या बांधकामात ग्रीन झोन राखण्यावर भर देण्यात आला आहे.
याबाबत इंडियन एअरपोर्ट अथॉरिटीचे मुख्यव्यवस्थापक डी. के. कामरान म्हणाले, की ग्रीन झोनसाठी विशेष तंत्रज्ञान वापरले आहे. त्यावर जास्त खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना शुद्ध वातावरण मिळेल.
ही आहेत विमानतळाची वैशिष्ट्ये
-306 एकर परिसरावर विमानतळ पसरले आहे.
- पहिल्या फेजसाठी 500 कोटी रुपये खर्च करण्यात आले.
- यासाठी हरियाणा सरकारने 49 टक्के तर पंजाब सरकारने 51 टक्के खर्च केला आहे.
- 500 टॅक्सी पार्क करण्याची सुविधा.
- चेक इन करण्यासाठी एकूण 48 काऊंटर. डिपार्चर कन्व्हेअर बेल्टला अटॅच.
- 40 टक्के एलईडी लाइट्स लावण्यात आले आहेत.
- 3 एअरोब्रिज लावण्यात आले असून आणखी दोन लावता येतील.
-1600 प्रवाशी प्रति तास क्षमता.
- डिपार्चरसाठी इलिव्हेडेट रोड तयार करण्यात आला आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या चकाचक विमानतळाची आणखी छायाचित्रे....