आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Encounter Leader Instead Of Gangster In Punjab

PHOTOS: गॅंगस्टरच्या जागी नेत्याचाच केला एन्काऊंटर, पंजाब पोलिसांचा प्रताप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर- पोलिस कधी काय करतील काही सांगता येत नाहीत. पोलिसांनी न मैत्री ठेवलेली बरी ना वैर असे म्हटले जाते. पंजाबच्या पोलिसांनी गॅंगस्टरच्या जागी चक्क एका नेत्याचाच एन्काऊंटर केला. विशेष म्हणजे त्यांच्यावर एका दोन नव्हे तर गोळ्यांच्या फैरी झाडल्या. आपली चुक लक्षात आल्यावर पोलिसांनी क्रॉस फायरिंगमध्ये नेता मारला गेल्याचे कारण दिले आहे. परंतु, मुद्दाम एन्काऊंटर करुन नेत्याची हत्या केल्याचा आरोप नेत्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
याबाबत अमृतसरचे पोलिस आयुक्त जतिंदरसिंग औलख यांनी सांगितले, की जग्गू नावाच्या गॅंगस्टरला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. यावेळी झालेल्या क्रॉस फायरिंगमध्ये अकाली दल नेते मुखजीतसिंग उर्फ मुख्खा यांना गोळ्या लागल्या. एका पोलिस हवालदारालाही गोळ्या लागल्या आहेत. पोलिसांनी कट रचून मुख्खा यांना ठार मारले असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. गावातील काही लोकांसोबत मुख्खा यांचे वैर होते.
25 मे रोजी मुख्खा यांचा शेजारी गुरदेवसिंग यांचीही गोळ्या मारुन हत्या करण्यात आली होती. आता त्याच्या नातलगांनी पोलिसांसोबत मिळून मुख्खा यांची हत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
पोलिसांचे तर्क- गॅंगस्टर जग्गू मुद्दल गावाजवळ पांढऱ्या रंगाच्या आय-20 कारमध्ये फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे आम्ही सापळा रचला. यावेळी मुख्खा पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये येत होते. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्यांनी कार जोरात पळवली. यावेळी पोलिस सिव्हिल ड्रेसमध्ये होते. त्यांनी थोड्या अंतरावर मुख्खा यांच्या कारला घेरले. मुख्खाने पिस्तुल काढून फायरिंग सुरु केली. त्यामुळे पोलिसांनाही फायरिंग करावी लागली. यात मुख्खा मारले गेले.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेशी संबंधित छायाचित्रे... असा झाला एन्काऊंटर...