आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ट्रकने गर्भवती महिलेला चिरडले, मृत्यूपूर्वी रस्त्यावर दिला बाळाला जन्म

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर (पंजाब)- पतीसोबत रुग्णालयात जात असलेल्या गर्भवती महिलेला एका भरधाव ट्रकने चिरडले. पण मरण्यापूर्वी महिलेने बाळाला जन्म देऊन आई होण्याचे कर्तव्य पुर्णपणे बजावले. दु्र्दैवाने या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला.
बंडाला येथील रहिवासी मनजिंदर काल (बुधवार) सकाळी पत्नी लक्ष्मी कौरसोबत रुग्णालयात जात होता. डिलिव्हरीची तारिख जवळ आली असल्याने अत्यावश्यक चाचण्या करण्यासाठी दोघे बाईकवर जात होते. यावेळी एका भरधाव ट्रकने त्यांच्या बाईकला निसटसा धक्का दिला. यात लक्ष्मी रस्त्यावर पडली. यावेळी मागून आलेल्या ट्रकच्या चाकाखाली लक्ष्मीचे शिर आले. एवढा भयंकर अपघात झाल्यावरही लक्ष्मीने बाळाला जन्म दिला. त्यानंतर जरा वेळाने तिचा मृत्यू झाला.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेशी संबंधित आणखी फोटोज...