आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबचा हा शेतकरी विकतो चक्क वीज, दररोज मिळते 46,200 रुपये उत्पन्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भटिंडा/मुक्तसर (पंजाब)- शेतकरी जगदेवसिंग यांनी सुमारे 12 एकर शेतात दिड मेगावॅट वीजेचा सोलर प्रोजेक्ट लावला आहे. त्यातून सुमारे 5500 युनिट वीज निर्माण होते. उन्हाळ्यात जेव्हा सूर्य प्रखर असतो तेव्हा वीजनिर्मिती सुमारे 9000 युनिट्सवर जाते. तयार झालेली वीज ते केंद्र सरकारला 17 रुपये 90 पैसे प्रति युनिट या दराने विकतात. यातून त्यांना दररोज सुमारे 46,200 रुपये उत्पन्न मिळते.
केंद्र सरकारच्या 'जवाहरलाल नेहरु सोलर मिशन' या योजने अंतर्गत जगदेवसिंग यांनी 12 एकर जागेवर सोलर प्रोजेक्ट टाकला आहे. यासाठी त्यांनी केंद्रासोबत 25 वर्षांचा करार केला आहे. केंद्राला वीज देण्यासह गावातील वीज स्टेशनलाही ते वीज पुरवतात. पंजाब सरकार त्यांना प्रति युनिट 8.40 रुपये दर देते. त्यातूनही त्यांना उत्पन्न मिळते.
यासंदर्भात जगदेवसिंग यांनी सांगितले, की शेतात पिक असेल तर उत्पन्न मिळेल की नाही याची कायम काळजी लागली असते. पण आता मी वीजेचे पिक घेत आहे. हे माझ्या जन्मभरासाठी आहे. लहान शेतकरी आपले शेत मोठ्या कंपन्यांना देऊनही वीज निर्माण करु शकतात.
पुढील स्लाईडवर वाचा, मुलाने स्पेनमध्ये बघितली वीजेची शेती... नंतर भारतात आणले तंत्रज्ञान...