आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Punjab Farmer Earn Crores Of Rupees Through Contract Farming

शेतीने घरी आली समृद्धी, आता 40 लाखांच्या ऑडीमध्ये फिरतो हा शेतकरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानीपत/यमुनानगर- शेती म्हणजे नुकसानीचा धंदा असे चित्र उभे केले जाते. परंतु, यमुनानगरच्या नकटपूर गावातील एका शेतकऱ्याने हे चित्र समुळ बदलले आहे. आता हा शेतकरी 40 लाखांच्या ऑडी कारमध्ये फिरतो. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून केलेल्या शेतीने त्याच्या शेतीत पिकलेला बासमती तांदुळ ब्रिटनमध्ये विकला जातो. शेतीचा खर्च कमी करण्यासाठी आता हा शेतकरी विदेशी तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. या शेतकऱ्याचे नाव डॉ. निर्मलसिंग असे आहे.
शेतीसाठी नोकरीची ऑफर धुडकावली
डॉ. निर्मलसिंग लहान असतानाच वडीलांचे निधन झाले. तरी त्यांनी हिमतीने काम केले. कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर आल्यावर नोकरीऐवजी शेती करण्याचा निर्णय घेतला. ट्रिपल एमए, एमएड, एमफील आणि पीएचडी केल्यानंतर त्यांना नोकरीच्या अनेक ऑफर आल्या. पण त्यांनी सगळ्या फेटाळल्या. केवळ शेतीची निवड केली. योग्य पद्धतीने केली तर शेतीपेक्षा चांगला व्यवसाय नाही, असे निर्मलसिंग सांगतात.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
शेतीसाठी डॉ. निर्मलसिंग अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्यांनी शेती करण्याचा पारंपरिक पद्धतीतही अमुलाग्र बदल केले आहेत. त्यामुळे त्यांच्या शेतीची उत्पादकता वाढली आहे. शिवाय शेतीसाठी येणारा खर्चही कमी झाला आहे. पाण्यावर येणारा खर्चही निम्म्याने कमी झाला आहे. फवाऱ्याच्या माध्यमातून शेतीला पाणी दिले जाते. नवीन तंत्रज्ञान शेतीत राबविण्यासाठी त्यांनी दोन वेळा ब्रिटनचा दौरा केला आहे.
अशी शोधली माल विकण्याची संधी
निर्मलसिंग यांच्या मालकीची 40 एकर जमीन आहे. 60 एकर जमीन त्यांनी करारावर घेतली. अशा एकूण शंभर एकर जमिनीत ते धानाची शेती करतात. त्यांच्या शेतीत बासमती तांदुळ होतो. 1997 पासून त्यांनी शेतात झालेला गहू कधी भारतीय बाजारपेठेत विकला नाही. त्यांनी लंडनच्या टिल्डा राइसलॅंड कंपनीसोबत करार केला आहे. त्यांचा तांदुळ हिच कंपनी विकत घेते. याची त्यांनी मोठी किंमत मिळते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, शेतात काम करताना उच्चशिक्षित निर्मलसिंग... अशी आहे त्यांची शेती...