चंदिगड- दीनागर पोलिस ठाण्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेले एसपी बलजीतसिंग यांचा मुलगा मनिंदरसिंग याला डीएसपी करण्याचा आणि 25 लाख रुपये रोख मदत देण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी पोलिस आणि प्रशासनाशी चर्चा करुन हा निर्णय घेतला. या शिवाय या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना प्रत्येकी तीन लाख आणि उपचारांचा खर्च मिळणार आहे.
बलजीतसिंग यांना मरणोपरांत राष्ट्रपती मेडल मिळावे, यासाठी पंजाब सरकारकडून शिफारस केली जाणार आहे. या दहशतवादी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पंजाब पोलिसांच्या जवानांना निवृत्तीच्या वयापर्यंत संपूर्ण वेतन दिले जाणार आहे. शिवाय त्यांच्या मुलांना निशुल्क शिक्षण दिले जाईल.
पंजाब रोडवेजचा ड्रायव्हर नानक चंद याला 15 ऑगस्टला स्टेट अवार्ड देऊन गौरविले जाईल. तसेच दोन लाख रुपये आर्थिक मदत दिली जाईल. ठार झालेल्या होमगार्डच्या मुलांना पंजाब पोलिसमध्ये कॉन्स्टेबल पदावर नियुक्त केले जाईल. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सामान्य नागरिकांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी दिली जाईल.
पत्नी आणि तीन मुले कुटुंबात
शहिद बलजीतसिंग यांच्या कुटुंबात पत्नी कुलवंत कौर, मुलगा मनिंदरसिंग (वय 24) आणि दोन मुली परमिंदर कौर (वय 22) आणि रविंदर कौर (वय 20) आहेत. मनिंदर बी टेकचे शिक्षण घेत आहे. परमिंदर अॅथलेट असून रविंदर बीडीएस करीत आहे.
पुढील स्लाईडवर बघा, बलजीतसिंग यांना अशी डोक्यात लागली होती गोळी...