आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Punjab Police SP Baljeet Singh Killed In Terrorist Encounter

दहशतवाद्यांचा खातमा करुनच परत येईल, SP बलजीतसिंग यांचे अखेरचे शब्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड (पंजाब)- दहशतवाद्यांचा खातमा करुनच परत येईल, पंजाबच्या गुरदासपुर जिल्ह्यातील दीमानगरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिद पोलिस आयुक्त (डिटेक्टिव्ह) बलजीतसिंग यांचे हे अखेरचे शब्द होते. दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा बलजीतसिंग यांनी सहकाऱ्यांसह जोरदार प्रतिकार केला.
बलजीतसिंग यांच्यासोबत दहशतवाद्यांचा मुकाबला करीत असलेले भुपेंद्रसिंग यांनी सांगितले, की दहशतवादी बलजीतसिंग यांच्यावर जोरदार गोळीबार करीत होते. पोलिस ठाण्याच्या टेरेसवर पाण्याच्या टाकीमागे लपून बलजीतसिंग दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देत होते. आम्ही त्यांना जरा जपून राहण्यास सांगितले. तेव्हा ते म्हणाले, की तुम्ही माझी काळजी करु नका. पुढे जात राहा. मी यांना ठार मारुनच येथून जाणार आहे. तेव्हा एक गोळी त्यांच्या डोक्याला लागली. यात ते जबर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांचा मृत्यू झाला.
कपूरथला येथील रहिवासी बलजीतसिंग यांना दीड महिन्यांपूर्वीच प्रमोशन मिळाले होते. दीनानगर पोलिस ठाण्यात गोळीबार होत असल्याची माहिती मिळाल्यावर ते लगेच टीमसह घटनास्थळी गेले. पोलिस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर सहकाऱ्यांसह थांबले होते. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्या टीमवर जोरदार गोळीबार केला. यात एक गोळी त्यांच्या डोक्याला लागली.
बलजीतसिंग चांगले हॉकी प्लेअर होते. भारतीय हॉकी संघात ते मिडफिल्डर होते. 1993 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या मॅचमध्ये त्यांनी डेब्यू केले होते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, शहिद बलजीतसिंग यांचे आणखी फोटो....