आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ravana Cave In Sri Lanka Visit By Chandigarh Boy

PHOTO - अजूनही येथे आहे रावणाची रहस्यमयी गुहा; जो एकदा आत गेला तो बाहेर आलाच नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रावण गुहेचे मुख्यद्वार
चंडीगड - श्री राम आणि रावण यांच्याबद्दल वेगवेगळ्या जागांबद्दल तुम्ही लहानपणापासून ऐकत आला असाल, मात्र नुकतेच रामायणाच्या खाणाखुणा अजूनही सापडतात. हे ऐकून विश्वास बसत नाही ना. दोन वर्षापूर्वी एका व्यापार्‍याला कामासाठी श्रीलंकेला जावे लागले तेव्हा लोकांनी तेथे रामायणाशी जोडलेल्या काही प्रतिकांबद्दल त्यांना सांगितले. तेव्हा त्यांना जायला जमले नाही, मात्र सहा महिन्यांनी ते पुन्हा जेव्हा श्रीलंकेत गेले तेव्हा त्यांनी एक भाड्याने गाडी घेऊन कोलंबोवरून प्रवास सुरू केला. तेथून ते कँडीच्या त्या मंदिरात गेले जेथे भगवान बुध्दांचा दात ठेवलेला आहे. लहान डोंगरावर बनलेल्या या मंदिराला टुथ रेलिक टेंपल म्हटले जाते. तेथून ते पुढे अशोक वाटीकेला गेले जेथे सीता अहिल्या मंदिर आहे. येथे आजही पाण्याचा तो झरा आहे जेथे सीता आंघोळ करत होत्या. तसेच येथे हनुमानाच्या पायाचे निशाणही आहेत. याच ठिकाणी सीतेने अग्नीपरिक्षा दिलेले मंदिरही आहे. हे व्यापारी जेव्हा त्या मंदिरात गेले तेव्हा त्यांना असे कळाले की, श्रीलंकेच्या न्यायालयात सुनावणीपूर्वी या मंदिराच्या शपथा घेतल्या जातात.
येथून थोड्याच अंतरावर रावणाची गुहा आहे. जंगलाच्या मधोमध असलेल्या या गुहेपर्यंत पोहोचण्याचा रस्ता धोकादायक आहे. लोक असे म्हणतात, त्या ठिकाणी आतापर्यंत जो व्यक्ती गेला तो वापस आलाच नाही. मात्र या व्यापार्‍याने धाडस करत त्या गुहेच्या दारापर्यंत मजल मारली. गुहेपर्यंत जाणार्‍या रस्त्यात काळाकुट्ट अंधार आहे. तसेच रस्त्यात अनेक साप आहेत. खड्ड्यांनी भरलेला रस्ता पार करत त्यांनी रावणाच्या गुहेचा दरवाजा गाठलवा. तेथेच डोके टेकवून ते परतले. कारण गुहेमध्ये जाण्याची त्यांची हिम्मत झाली नाही.
ते सांगतात या प्रवासात सर्वात अविस्मरणीय गोष्ट अशी की, हे जंगलाच्या मधोमध बनलेले असे संग्रालय आहे जेथे आजही अनेक अशा गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल जास्त कोणाला माहिती नाही. यामध्ये त्यांनी 101 शिवलिंगाचा फोटो घेतला. या शिवलिंगांची पुजा रावणाने रामाशी झालेल्या युध्दाच्या पहिले केली होती. या संग्रहालयात नारळाच्या आकाराचे रुद्राक्षही आहेत ज्यांच्यावर शेषनागाचे चित्र आहे. रावण बागेबद्दल बोलायचे झाल्यास हे एक असे ठिकाण आहे, जेथे हजारो वर्षांपूर्वीचे फुल-झाडे आहेत. मुनेश्वर मंदिर एक असे मंदिर आहे जेथे रामाने रावणाचा वध केल्यानंतर शिवाची पुजा केली होती. चला तर मग पाहूयात या ठिकाणचे फोटो आणि त्यांची माहिती.

पुढील स्लाईडवर पाहा, श्रीलंकेतील या रहस्यमयी मंदिरांबद्दल आणि त्यांचे PHOTO सुध्दा