आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Read Story On How SP Baljeet Singh Fight With Terrorist

पाकिस्तानियों, दम असेल तर समोर या, शहिद SP नी दहशतवाद्यांना दिले होते आव्हान, वाचा आखों देखी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानियों! दम है तो सामने आकर लड़ो, जैसे मैं खुले में खड़ा हूं। जवाब मिला- हम तो ऐसे ही लड़ेंगे। बलजीत ने कहा- ‘तो फिर ठीक है, चुन-चुनकर मारेंगे। जहां भी छिपना है, छिप जाओ।’ एसपी बलजीतसिंग यांनी अशा प्रकारे दहशतवाद्यांना आव्हान दिले होते. या बातमीत वाचा आखों देखी. जाणून घ्या बलजीतसिंग आणि दहशतवाद्यांमध्ये झालेला संवाद.
अमृतसर- पंजाबच्या गुरदासपुरचे दीनानगर पोलिस स्टेशन. वेळ- सोमवार सकाळी 8 वाजता. पोलिस स्टेशनच्या दुसऱ्या मजल्यावर तीन दहशतवादी लपले होते. या इमरतीच्या समोर एका रुग्णालयात इमारत आहे. त्यावर एसपी बलजीतसिंग चढले होते. तेथून ते दहशतवाद्यांवर गोळीबार करीत होते. स्वात टीमचे कमांडो इमारतीच्या खालून दहशतवाद्यांवर फायरिंग करीत होते. बलजीतसिंग यांनी चार तास दहशतवाद्यांना कडवे आव्हान दिले. यावेळी एक गोळी त्यांच्या डोक्याला लागली. जरा वेळात ते शहिद झाले. या घटनेची माहिती स्वात कमांडोने सांगितली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही त्याचे नाव जाहीर केलेले नाही.
स्वात कमांंडो सांगतो, की दहशतवादी दुसऱ्या मजल्यावर लपले होते. तेथून निरंतर गोळीबार करीत होते. एक जिगरबाज ऑफिसर आला. तो त्यांना प्रखर प्रतिकार करीत होता. सुरवातीला तो रुग्णालयाच्या टेरेसवर चढला. तेथून दहशतवाद्यांवर गोळीबार करीत होता. रुग्णालयाच्या टेरेसवर असलेल्या पाण्याच्या टाकीमागे तो लपला होतो. दहशतवाद्यांपासून तो केवळ 35-40 फुट अंतरावर होता.
यावेळी बलजीतसिंग यांनी दहशतवाद्यांना आव्हान दिले. ते म्हणाले, की पाकिस्तानियों! दम है तो सामने आकर लड़ो, जैसे मैं खुले में खड़ा हूं। जवाब मिला- हम तो ऐसे ही लड़ेंगे। बलजीत ने कहा- ‘तो फिर ठीक है, चुन-चुनकर मारेंगे। जहां भी छिपना है, छिप जाओ।’
त्यावर दहशतवादी काही तरी म्हणाले. पण ते ऐकू आले नाही. भाषा पंजाबी होती. दहशतवादी पंजाबीमध्ये बोलत होते. यावरुन अंदाज येत होता, की दहशतवादी पाकिस्तानी पंजाबी आहेत. या दरम्यान जोरदार गोळीबार सुरु झाला. त्यामुळे त्यांच्यातील संवादही समजला नाही.
गोळीबार जरा थांबल्यासारखा झाला. तेव्हा बलजीतसिंग पुन्हा उभे झाले. दहशतवाद्यांना आव्हान देत म्हणाले, तुम्ही पंजाबी आहात असे वाटते. पण तुम्हाला माहिती नाही खरे पंजाबी कसे असतात. हे आज आम्ही तुम्हाला दाखवू. तुम्ही येथे येऊन चुक केली आहे. तुमचे वय 20-22 वर्षांचे वाटते. मी तुमच्यापेक्षा दुप्पट वयाचा आहे. तरीही येथे उभा आहे. हिंमत असेल तर समोर येऊन लढा.
त्यानंतर तुफान गोळीबार सुरु झाला. बलजीतसिंग यांनी टाकीचा आसरा घेतला. यावेळी आम्ही इमारतीच्या खालून फायरिंग करीत होतो. त्यावेळी एक कमांडो त्यांना म्हणाला, की तुम्ही खाली या. आम्हाला समजले आहे, की ते कुठे लपले आहेत.
त्यावर बलजीत म्हणाले, की युद्ध लपून लढले जात नाही. जो समोर सरकतो तोच जिंकतो. आपण त्यांना जिवंत पकडू. तुम्ही बघाच.
त्यानंतर स्वात टीमचे दोन कमांडो इमारतीवर चढले. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार होत होता. तब्बल चार तास बलजीतसिंग दहशतवाद्यांचा मुकाबला करीत होते. त्यांनी पुन्हा दहशतवाद्यांना आव्हान दिले. दहशतवाद्यांचा जसा आवाज आला, एकाला शुट केले. आता दोनच दहशतवादी शिल्लक होते. पण....
सुमारे 12:15 वाजताच्या दरम्यान एक गोळी बलजीतसिंग यांच्या डोक्याला लागली. ते जबर जखमी झाले. पण जोरदार गोळीबार सुरु होता. जवळपास अर्धा तास त्यांना इमारतीवरुन खाली आणता आले नाही. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आम्ही मोर्चा सांभाळला. दहशतवाद्यांचा खातमा केला.
पुढील स्लाईडवर बघा, घटनेशी संबंधित फोटो....