आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Leader Declare 1 Lacks For Slapping Amir Khan

आमिरच्या कानाखाली वाजवा, 1 लाख रुपये मिळवा, शिवसेना नेत्याची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना (पंजाब)- भारतात असहिष्णूता वाढत असल्याचे वक्तव्य केल्याने बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या कानाखाली वाजवा आणि 1 लाख रुपये रोख मिळवा, अशी घोषणा शिवसेनेच्या पंजाब शाखेचे प्रमुख राजीव टंडन यांनी केली आहे. दरम्यान, ही पक्षाची भूमिका नसल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात राजीव टंडन म्हणाले, की आमिर खानला जो कुणी कानाखाली मारेल त्याला शिवसेनेकडून 1 लाख रुपये रोख दिले जातील. या देशात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने देशाचा अपमान होईल असे वक्तव्य करु नये यासाठी अशी शिक्षा आवश्यक आहे. सध्या आमिर लुधियानाला आला आहे. तो राहत असलेल्या हॉटेलचा स्टाफ किंवा त्याच्यासोबत चित्रपटात काम करणारे कलाकार यापैकी जे कुणी त्याच्या कानाखाली लावतील त्यांना बक्षिस दिले जाईल.
आमिर खान सध्या 'दंगल' या चित्रपटाच्या शुटिंगसाठी लुधियानाला आला होता. तो एका हॉटेलमध्ये थांबला होता. यावेळी त्याने वेटरला विचारले होते, की बाहेर परिस्थिती कशी आहे. या हॉटेलच्या बाहेर शिवसेना आणि इतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केले.
पुढील स्लाईडवर वाचा, लुधियाना सोडून आमिर खान मुंबईला आला परत....