बठिंडा (पंजाब)- सेंट्रल युनिव्हर्सीच्या पायाभरणी सोहळ्यात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती ईराणी यांनी केंद्रीय फूड प्रोसेसिंग मिनिस्टर हरसिमरत कौर यांच्यासोबत जोरदार डान्स केला. दोघींच्या स्वागतासाठी मंचावर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात दोघांनी सहभागी होऊन डान्स केला.
यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी संबोधित केले. ते म्हणाले, की स्मृती ईराणी पंजाबी आहेत. मंत्री झाल्यावर त्या पहिल्यांदा बठिंडाला आल्या आहेत. आम्हाला त्यांनी एक गिफ्ट द्यायलाच हवे.
प्रकाशसिंग बादल यांनी असे म्हणताच स्मृती ईराणी जागेवरुन उठल्या. बादल यांच्या जवळ गेल्या. माईक पकडून म्हणाल्या, की मी पंजाबी मल्होत्रा कुटुंबातील आहे. आमच्याकडे मुलींना दिले जाते. त्यांच्याकडून काही घेतले जात नाही. त्यावर प्रकाशसिंग म्हणाले, की मी तुझ्यासाठी जीव देऊ शकतो. त्यावर स्मृती म्हणाल्या, की मुली वडीलांचा जीव घेऊ शकत नाही.
त्यानंतर स्मृती म्हणाल्या, की काही वेगळे असेल तर मला द्या. त्यावर प्रकाशसिंग यांनी स्मृतींच्या डोक्यावर हात ठेवला. म्हणाले, माझ्याकडे देण्यासाठी केवळ आशिर्वाद आहेत. स्मृती यांनी आशिर्वाद घेतला. त्यानंतर जागेवर जाऊन बसल्या. त्यावर बादल म्हणाले, की मी तुमच्या डोक्यावर हात ठेवला. आता तुम्हीही माझ्या डोक्यावर हात ठेवा. बादल यांना पंजाबसाठी काही मागायचे होते.
पुढील स्लाईडवर बघा, कार्यक्रमाचे फोटो.... स्मृतींनी असा केला डान्स...