आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SP Baljeet Singh Father Achar Singh Was Also Killed In Terrorist Attack

SP बलजीतसिंग यांचे वडीलही दहशतवादी हल्ल्यात झाले होते शहिद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कपूरथला- गुरदासपूर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलिस आयुक्त बलजीतसिंग शहिद झाले. त्यांचे वडीलही पोलिस विभागात होते. त्यांचा मृत्यू 1984 मध्ये दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या रस्ता अपघातात झाला होता.
कपूरथलावर शोककळा
बलजीतसिंग यांचे वडील अच्छरसिंग 1984 मध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहिद झाले होते. बलजीतसिंग यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यावर संपूर्ण कपूरथलावर शोककळा पसरली. पोलिस अधिकारी आणि येथील रहिवासी त्यांच्या घरी आले.
वडील आणि मुलगाही शहिद
1984 मध्ये दहशतवादी कारवायांनी पंजाब पेटले होते. यावेळी बलजीतसिंग यांचे वडील अच्छरसिंग दहशतवाद्यांना चांगलाच धडा शिकवत होते. तेव्हा एक रस्ता अपघात घडवून आणत दहशतवाद्यांनी अच्छरसिंग यांना ठार मारले होते. अच्छरसिंग पंजाब पोलिसमध्ये पोलिस निरिक्षक होते. त्यानंतर बलजीतसिंग यांना पोलिस विभागात नोकरी देण्यात आली होती.
गेल्या काही वर्षांमध्ये बलजीतसिंग एसएचओ सीटी कपूरथला, फगवाडा आणि मानसा येथे कार्यरत होते. त्यांनी सातव्या आयआरबी बटालियनमध्ये डेप्युटी कमांडर आणि सतर्कता विभागात अधिकारी म्हणून काम केले. दीड महिन्यांपूर्वी त्यांना पोलिस आयुक्त म्हणून पदोन्नती देण्यात आली होती.
पत्नी आणि तीन मुले कुटुंबात
शहिद बलजीतसिंग यांच्या कुटुंबात पत्नी कुलवंत कौर, मुलगा मनिंदरसिंग (वय 24) आणि दोन मुली परमिंदर कौर (वय 22) आणि रविंदर कौर (वय 20) आहेत. मनिंदर बी टेकचे शिक्षण घेत आहे. परमिंदर अॅथलेट असून रविंदर बीडीएस करीत आहे. उद्या कपूरथला येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, बलजीतसिंग यांच्या घरी गोळा झालेले शोकमग्न लोक...