आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होणार होती नर्स, पण दिल्लीतून आलेल्या एका फोनने झाली अॅक्ट्रेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड (पंजाब)- पंजाबी अॅक्ट्रेस हिमांशी खुराणाने आमची प्रतिनिधी 'जैमसी सचदेवा'सोबत करिअरबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. हिमांशी सांगते, की माझ्या वडीलांना मी नर्स व्हावे असे वाटत होते. माझेही मत जवळपास तसेच झाले होते. पण मला अॅक्ट्रेस होण्याची मनापासून इच्छा होती. या दरम्यान एका गाण्यात अॅक्टिंग करण्याचा दिल्लीतून फोन आला. 'जोडी' नावाच्या गाण्यातून करिअरला सुरवात झाली. त्यानंतर मागे वळून बघितले नाही.
मिस लुधियाला सौंदर्यस्पर्धा जिंकली
हिमांशी सांगते, की मी आधी पेजेंटमध्ये सहभागी होण्यास सुरवात केली. 2009 मध्ये लुधियाला कॉन्टेस्ट जिंकली. एका रॅम्प शोनंतर पोर्टफोलियो तयार केला. त्याचे फोटो लगेच व्हायरल झाले. मला अनेक ऑफर्स मिळाल्या. कॉस्मेटिक ब्रॅंडसाठी मी पहिला फोटोशुट केला.
पंजाबशी आहे नाळ
हिमांशी सांगते, की मी पंजाबची असल्याने मला माहिती आहे, की पंजाबमध्ये कोणता सिंगर चांगला गातो. लोकांना कोण आवडतो. मला दिल्लीतून फोन आला तेव्हा त्यांनी मला एकाच वेळी दोन गाण्यांची ऑफर दिली होती. त्यातील एक गाणे मला निवडायचे होते. मी कुलदीप मान आणि पंजाबी एमसी यांचे जोडी हे गाणे निवडले.
सेन्सॉर बोर्डसारखे आहे कुटुंब
मी माझे निर्णय स्वतः घेते. प्रोफेशन असो किंवा खासगी. मी कुणाला विचारुन काही डिसिजन घेत नाही. पण मी नेहमीच गोंधळात राहते. माझे कुटुंब अगदी सेन्सॉर बोर्डसारखे आहे. माझा एखादा व्हिडिओ आला तर ते सांगतात, की त्यात काय चांगले आहे आणि काय वाईट. त्यांनी दिलेले सल्ले मला कामी येतात.
पुढील स्लाईडवर बघा, पंजाबी अॅक्ट्रेस हिमांशी खुराणाचे ग्लॅमरस फोटो....