आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thief Murdered A Woman On Railway Track In Punjab

नागपुरहून परत येत असलेल्या महिलेला पंजाबमध्ये रेल्वे ट्रॅकवर चोरांनी भोसकले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाला- रात्रीच्या सुमारास ट्रेनमधील आपले सामान काही चोर चोरुन नेत असल्याचे बिंदिया नावाच्या महिलेने बघितले. ट्रेनची स्पिड कमी होती. चोरांनी ट्रेनमधून खाली उडी मारली. त्यांच्या मागे बिंदियानेही ट्रेनमधून उडी मारली.
बिंदिया आपल्या मागे येत असल्याचे समजल्यावर चोरांनी शस्त्रे काढली. रेल्वे ट्रॅकवरच तिला भोसकले. त्यानंतर तिचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर फेकून दिला. एका लग्नासाठी ती नागपुरला गेली होती. तेथून परत येत असताना ही घटना घडली. यावेळी रेल्वेत तिच्यासोबत मुलगा संदीप आणि मुलगी ममता होती.
लग्न आटोपून बिंदिया छत्तीसगड एक्सप्रेसमधून अमृतसरला परत येत होती. यावेळी तिच्यासोबत लग्नाची वरात होती. तिच्या बॅगमध्ये साडेतीन लाख रुपयांचे दागिने आणि चाळीस हजार रुपये रोख होते.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेचे संबंधित फोटो....