आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NRI पोरगी पोलिसाशी भिडली, हमसून हमसून रडत लावला विनयभंगाचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना (पंजाब)- काचेवर काळी फिल्म असलेली कार ट्राफिक पोलिसाने रोखून धरली. यावेळी चालान कापण्यावरुन कारचा मालक आणि पोलिसात चांगलीच बाचाबाची झाली. हे बघून कारभोवती लोक जमा झाले. जमाव हटवण्याचा प्रयत्न एक पोलिस करीत होता. यावेळी कारमधील NRI पोरिला त्याचा धक्का लागला. त्यानंतर ही पोरगी चक्क पोलिसाशी भिडली. तिने हमसून हमसून रडत पोलिसावर विनयभंगाचा आरोप केला. त्यानंतर पोरीचे इतर कुटुंबीय येथे दाखल झाले. त्यांनी बराच गोंधळ घातला. अखेर पोलिसांनी या पोरीची आणि तिच्या कुटुंबीयांची माफी मागत प्रकरण निकाली लावले.
हेमंत कुमार NRI पोरीसह स्विफ्ट कारमध्ये फगवाडा येथून पुष्पविहार कॉलनीकडे जात होते. आरती चौकात आल्यावर ट्राफिक पोलिसाने त्यांना अडवले. कारच्या काचांवर काळी फिल्म असण्यावर आक्षेप घेतला. आता चालान कापावे लागेल, असे पोलिसाने सांगितले. त्यानंतर हेमंत कुमार आणि ट्राफिक पोलिसात बाचाबाची झाली. कारमध्ये बसलेल्या NRI पोरीने चालान कापू नका असे दटावले. यावेळी जमा झालेल्या लोकांना हटविण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलिसाचा या पोरीला धक्का लागला. त्यानंतर या पोरीने चक्क विनयभंगाचा आरोपी करीत चांगलाच गोंधळ घातला.
पुढील स्लाईडवर बघा, ट्राफिक पोलिस आणि NRI पोरीत कसे झाले भांडण... केला विनयभंगाचा आरोप...
बातम्या आणखी आहेत...