आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vikas Khanna Will Prepare Dishes For PM Modi In America Visit

पोळ्या लाटताना छेडायच्या तरुणी, आता मोदींच्या अमेरिका दौऱ्यात सामिल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना (पंजाब)- पंतप्रधान नरेंद्र मोदी आयर्लंड आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. गेल्या वेळी त्यांचा उपवास असल्याने त्यांनी अमेरिका दौऱ्यात काहीच खाल्ले नव्हते. पण यावेळी मात्र त्यांच्यासाठी शाही मेजवानीचा बेत आहे. यासाठी भारतातील प्रसिद्ध शेफ विकास खन्ना त्यांच्यासोबत राहणार आहेत. मोदींसाठी ते शाकाहारी चविष्ट व्यंजने तयार करतील. यात पोहे, मोदक आणि ठंडाई यांचाही समावेस आहे. विकास यांचा जन्म अमृतसरला झाला. आठ वर्षांचे असताना आजीसोबत ते सुवर्णमंदारात जायचे. तेथील लंगरमध्ये सेवादान करायचे. यावेळी तरुणी त्यांना छेडायच्या. म्हणायच्या, हाय, तू एनीं गोल रोटियां किदां बना लैनां? तेव्हापासून विकासना स्वयंपाक करण्याची गोडी लागली.
शेफ ऑफ पंजाबमध्ये विकास खन्ना जजच्या भूमिकेत दिसले होते. त्यांचे अनेक रेसिपी बुक प्रकाशित झाले आहेत. विकास सांगतात, की मला कधी वाटले नव्हते, की माझी स्टोरी लोक ऐकतील. मी किट्टी पार्टीत 20 रुपयांमध्ये छोले भटुरे, थम्सअप आणि आयस्क्रीम द्यायचो. यासाठी छोडे भटुरे स्वतः बनवायचो. त्याचे भरपूर पैसे मिळायचे. अजूनही काही किट्टीपार्टीसाठी मला बोलविले जाते. अमेरिकेच्या फस्टलेडी मिशेल ओबामा मला नेहमी विचारतात, की अमेरिका आणि भारतात काय फरक आहे. मी त्यांना हेच सांगतो, की भारतातील लोक दिल खोल जगतात.
मेथी-आलू मिळत नाही
विकास सांगतात, की मला एकदा एका विदेशी शेफने विचारले, की मला कायम भारताची आठवण का येते. विदेशात सगळ्या गोष्टी मिळतात. त्यावर मी सांगितले, की मेथी आलू मिळत नाही. सध्या तरुणी पिढीला जंक फुड आवडते. पण हीच मुले जेव्हा घराबाहेर राहतात त्यांना आईच्या हातचे जेवण आठवते.
पुढील स्लाईडवर बघा, विकास खन्ना अनेक प्रतिष्ठित नेत्यांना भेटताना....