आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजोबांच्या मृतदेहावर व्हिस्की शिंपडत हसत हसत केला अंत्यसंस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधर (पंजाब)- मेरे अधरों पर हो अंतिम वस्तु न तुलसी-दल, प्याला, मेरी जीव्हा पर हो अंतिम वस्तु न गंगाजल, हाला..... अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांच्या मधुशालाच्या ओळी नाजरसिंग यांच्याबाबत अगदी तंतोतंग खऱ्या ठरतात. नकोदर येथील फाजिलपूर गावातून पन्नास वर्षांपूर्वी नाजरसिंग ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. काही दिवसांपूर्वी त्यांनी गावीच अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृतदेहावर हटके स्टाईलमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आला. 111 वर्षांचे नाजरसिंग व्हिस्कीचे शौकिन होते. त्यांना एकूण 98 नातवंडे आहेत.
ज्या उत्साहाने नाजरसिंग यांनी आयुष्य एन्जॉय केले त्याच अंदाजात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुणीही शोक व्यक्त केला नाही की कुणाच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले नाही. नाजर दररोज व्हिस्कीचा एक पेग घ्यायचे. त्यामुळे त्यांच्या मुलींनी त्यांच्या चितेत व्हिस्की शिंपडली. मृतदेहाशेजारी व्हिस्कीची बॉटल ठेवली. त्यांची पत्नी निरंजन कौरचे 12 वर्षांपूर्वीच निधन झाले आहे.
नाजरसिंग यांना आहेत 98 नातवंडे
नाजर मुळचे शेतकरी होते. 1965 मध्ये पत्नीसह ब्रिटनला स्थायिक झाले होते. त्यांची मुले तेथेच राहतात. त्यांच्या कुटुंबात 9 मुले, 34 नातवंडे आणि 64 पणतू आहेत.
मुलगा म्हणाला- लो बापूजी तुहाडी बची दारू, तुसी ही लै जो...
त्यांचा मुलगा मोहनसिंह अंत्यसंस्काराच्या वेळी म्हणाला, की वडीलांची एक बॉटल व्हिस्की शिल्लक होती. ती त्यांना समर्पित केली. यावेळी तो म्हणाला, की लो बापूजी तुहाडी बची दारू, तुसी ही लै जो...
पुढील स्लाईडवर बघा, नाजरसिंग यांच्या अंत्यसंस्काराचे फोटो....