आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wife Killed Commando Husband Over Extra Marital Relations

FB फ्रेंडशी लग्न करण्यासाठी 14 वर्षांचा मुलगा असलेल्या महिलेने केली पतीची हत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड (पंजाब)- पंजाब पोलिसमध्ये कमांडो असलेल्या जसबीरसिंग याच्या हत्येवरुन पडदा उघडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याची पत्नी सुखदीप कौर हिनेच भाचा आणि दोन सुपारी किलर्सच्या मदतीने हत्या घडवून आणल्याचे उघडकीस आले आहे. पतीला ठार मारुन फेसबुक फ्रेंडशी तिला लग्न करायचे होते. विशेष म्हणजे लग्न झाले आहे, 14 वर्षांचा मुलगा आहे हे तिने फेसबुक फ्रेंडपासून लपवले होते.
सुखदीप फेसबुकवर करायची रोमान्स
- सुखदीपचे फेसबुकच्या माध्यमातून एका तरुणाशी अफेअर सुरु होते. माझे अजून लग्न झाले नाही, असे तिने त्याला सांगितले होते.
- फेसबुक फ्रेंडने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला तिने संमती दिली होती.
- फेसबुक फ्रेंडसोबत तिचे शारीरिक संबंध होते, असेही सांगितले जात आहे.
- तिने प्रथम पतिला ठार मारले. त्यानंतर मुलालाही संपवण्याचा तिचा विचार असावा, असे पोलिसांनी सांगितले आहे.
- गेल्या तीन वर्षांपासून सुखदीप आणि फेसबुक फ्रेंडचा रोमान्स सुरु होता.
म्हणाली- मलाच ठार मारणार होता पती
- सुखदीपने सांगितले, की जसबीरसिंग यांचे एका विधवा महिलेशी शारीरिक संबंध होते. त्या विधवाला एक मुलगाही आहे.
- मी जसबीरला अनेकदा समजावले. विधवेशीही बोलले. पण दोघे संबंध मिटवण्यास तयार नव्हते.
- विधवेचा मुलगाही या नात्याने त्रस्त होता.
- त्यामुळे मी जसबीरला ठार मारण्याचा कट रचला. यासाठी भाच्याची मदत घेतली.
- यासाठी त्याला रात्री झोपेच्या गोळ्या दिल्या. तो बेशुद्ध पडल्यावर गळा आवळून ठार मारले. मृतदेहाची विल्हेवाट लावली.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, फेसबुक फ्रेंडच्या फोटोशी केला साखरपुडा...