आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तरुणीचा मृतदेह, तरुणाने केली होती आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बटाला (पंजाब)- बटाला जिल्ह्यातील कोटली वीरा गावात काल (बुधवार) रात्री मनदीप कौर गौरां हिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तेथून जरा दूर अंतरावर शेजारी राहणाऱ्या तरुणाचा मृतदेह एका झाडाला लटकलेला आढळून आला. दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरु होते. तरुणीची हत्या झाली आणि तरुणाने आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तरुणीचा भाऊ बलजीतसिंग याच्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तिंविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 
 
घराच्या खोलीत पडली होती मनदीप कौरचा मृतदेह
अतिरिक्त पोलिस आयुक्त इंद्रबीरसिंग यांनी सांगितले, की मनदीप कौरचा भाऊ बलजीतसिंग सरकारी अॅम्ब्युलंस सर्व्हिसमध्ये काम करतो. त्याने सांगितले, की रात्री त्याची बहिण, चुलत भाऊ आणि आई वडील घराबाहेरच्या अंगणात झोपले होते. मी शेतीच्या कामासाठी रात्री घरातून बाहेर पडलो. त्यानंतर जरा वेळाने परतलो. तेव्हा बघितले, की घराचे मुख्यदार उघडे आहे. दाराच्या शेजारी असलेल्या खोलीत मनदीपचा मृतदेह पडला होता. तो रक्ताने माखला होता. त्यानंतर मी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस घरी येत होते तेव्हा त्यांना घराच्या शेजारी असलेल्या एका झाडावर एका मुलाचा मृतदेह लटकलेला आढळून आला. तो आमचा शेजारी अमरजीतसिंग ऊर्फ अब्बू आहे. 
 
पोलिसांनी सांगितले मुलाचा मृत्यू झालाय
अमरजीतसिंगचे वडील रणधीरसिंग यांनी सांगितले, की आम्ही सगळे घराच्या गच्चीवर झोपलो होतो. सकाळी बघितले तर तो खाटेवर नव्हता. आम्ही शेजारी चौकशी केली. तेवढ्यात पोलिस तेथे दाखल झाले. त्यांनी सांगितले, की तुमच्या मुलाचा मृत्यू झालाय. त्याचा मृतदेह झाडाला लटकला आहे. 
 
दोन महिन्यांपूर्वी तुरुंगातून सुटला होता
इंद्रबीरसिंग यांनी सांगितले, की आम्ही दोन्ही कुटुंबांकडून माहिती घेतली. सर्व शक्यतांवर आम्ही तपास करीत आहोत. त्याचे एका महिलेसोबत संबंध असल्याचे सांगितले जाते. यासंबंधी झालेल्या एका खून प्रकरणी तो तुरुंगात होता. गेल्या दोन महिन्यांपूर्वी तो सुटला. 
 
पुढील स्लाईडवर बघा, घटनेशी संबंधित फोटो....