आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईवडीलांची एकुलती एक लेक 20 वर्षांची महिमा घेणार दिक्षा, वडिलांच्या डोळ्यांत उभे राहिले अश्रू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांसवाडा (राजस्थान)- 20 वर्षांची महिमा आज (शुक्रवार) सायंकाळी दिक्षा घेणार आहे. त्यानंतर तिला साध्वी श्रद्धा गोपाल माही दीदीच्या नावाने ओळखले जाईल. तिचे वडील पुरुषोत्तम शर्मा आणि आई जयमाला शर्मा शिक्षक-शिक्षिका आहेत. त्यांचे कुटुंब आर्थिक संपन्न आहे. तरीही महिमाने दिक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे ती वैराग्य जीवन जगणार आहे.
आजन्म अन्न घेणार नसल्याचा संकल्प महिमाने घेतला आहे. दिवसातून एकदा केवळ फलहार ती घेणार आहे. बीए बीएड पूर्ण करुन ती वैराग्य धारण करीत आहे. महिमा सांगते, की हातात मोठी डिग्री असेल तर लोकांवर प्रभाव पडतो. अन्यथा लोक म्हणतात शिक्षणात कमकुवत असल्याने वैराग्य स्वीकारले असेल.
महिमा सांगते, की कुटुंबासोबत राहून भागवत भक्ती आणि गौसेवा शक्य नाही. कुटुंबात राहिल्याने माणसाच्या सीमा निर्धारित होतात. दररोज 84 हजार गायी कापल्या जात आहेत. प्रत्येकाने गौसेवा केली पाहिजे. केवळ हिंदू म्हटल्याने आपण हिंदू होत नाहीत. या धर्माचे पूर्णतः पालन करायला हवे. मी कधीही लग्न करणार नाही. माझ्या आईवडीलांची मी एकुलती एक लेक आहे. पण त्यांनीही मला आशिर्वाद देण्याचे पुण्यकर्म केले आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, महिमाचे फोटो... यानंतर ती अशी दिसणार नाही... ती एक साध्वी होणार आहे...