आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: मोदींचे 3D भाषण एकाचवेळी शंभरहून अधिक शहरामध्‍ये झाले प्रसारित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी जोधपूरमध्‍ये गर्दी जमली होती. थ्रीडी तंत्रज्ञानाद्वारे देशातील शंभर शहरांमध्ये एकाच वेळी सभा घेण्याची किमया साधली गेली.

45 मिनिटे चाललेल्‍या या भाषणात मोदी म्‍हणाले, की मला जाती- पातीमुळे मतदान करु नका तर विकासासाठी मतदान करा. सुशासनासाठी मतदान करा.

सॅटेलाईट डिश
गांधीनगरच्‍या स्‍टुडियोमधून मोदींनी भाषण केले. ते थेट प्रेक्षेपणासह सॅटेलाईटला पाठविले. तेथून सिग्‍नलद्वारे सॅटेलाईट डीशमध्‍ये रिसीव्‍ह केले. या प्रोजेक्‍टरची किंमत 70 लाख रुपये आहे. स्‍क्रीनच्‍या कापडाची किंमत 20 लाख रुपये आहे.

मोदींसमोरच असल्याचा भास
थ्रीडीमुळे याठिकाणीच ही सभा होत असल्याचा भास होत होता. मोदी यांनी उपस्थितांना दोन्ही हात वर करून भारतमातेच्या जयजयकाराच्या घोषणा देण्याचे आवाहन केले. त्याला लोकांनी जोरदार प्रतिसाद दिला

पुढील स्‍लाइवर पाहा 3D मधील मोदींची छायाचित्रे...