आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 9 People Died In Road Accident Of Picup And Bolero

अपघातानंतर दुध वाहिले, रक्‍तानेही माखला रस्‍ता, वाचा घटनेची भयानकता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीकर (राजस्‍थान) - बोलेरो आणि पिकअप या दोन वाहनांमध्‍ये ओव्‍हरटेक करण्‍याच्‍या नादात मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात सीकरच्‍या एका गावातील एकाच परिवारातील पाच लोकांसह 9 जण ठार झाले आहेत. प्रवाशांचे रक्‍त आणि दुस-या वाहनातील दुधाने रस्‍ता माखला होता.
या अपघातातील मृतांमध्‍ये सर्व एकाच कुळातील होते. ते आपल्‍या गावाहून सीकर जिल्‍ह्यातील फतेहपूर स्‍टेशन जवळ असलेल्‍या बालाजी धाम येथे गेले होते. ग्रामस्‍थांनी सांगितले की, दारूचे व्‍यसन सोडण्‍यासाठी बालाजी धाम प्रसिद्ध मानले जाते. त्‍यामुळे अधिकाधीक लोक दारूचे व्‍यसन सोडण्‍यासाठी आपल्‍या परिवारासोबत येथे दर्शनासाठी जातात. या अपघातातील कुटूंबीय सुद्धा दर्शनासाठी तेथे गेले होते. मात्र या अपघातात एका परिवारातील एक युवक साेडला तर, प्रत्‍येकाला आपला जीव गमवावा लागला.
दृष्‍य पाहून बघ्‍यांच्‍या अंगावर काटा
अपघातातील पिकअपमध्‍ये दूधाचे ड्रम होते. अपघातानंतर ड्रम कोसळून रस्‍त्‍यावर मोठ्या प्रमाणात दूध सांडले, तर दुस-या वाहनातील लोकांना जबर दुखापत झाल्‍याने रक्‍तानेही रस्‍ता माखला होता. हे दृष्‍य पाहून बघ्‍यांच्‍या अंगावर काटा उभा राहिला.
कोणी भाऊ गमावला, तर कोणी पिता
हा अपघात किती भीषण असू शकतो हे अपघातग्रस्‍त वाहनांच्‍या स्‍थितीवरून लक्षात येऊ शकते. एकाच परिवारातील पाच सदस्‍यांसह एकूण नऊ जणांना या अपघातात आपले प्राण गमवावे लागले. अपघातातून सुरक्षित राहिलेल्‍या जिजोटच्‍या बलाइयोमधील जयलालने सांगितले की, आई, भाऊ, बहीण, मेहूणा, भाची या अपघातात आपण गमावले आहेत. त्‍याच्‍या वडिलांचेही चार वर्षांपूर्वीच निधन झाले हाेते.
भीषण अपघाताचे फोटो पाहण्‍यासाठी पुढील स्लाईडवर क्‍लिक करा..