Home | National | Rajasthan | off scenes staging in a front of children

मुलांसमोर 2 तास सुरु होते अश्लील सीन, पालकांनी डोळे बंद करुन नेले बाहेर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 25, 2018, 04:44 PM IST

एवढेच नाही तर संवादामध्ये देखील अश्लील आणि द्विअर्थी शब्द प्रेक्षकांना एेकायला मिळाले.

  • जयपूर. जवाहर कला केंद्राच्या (जेकेके) मध्यवर्ती ओपन एअर थियटरमध्ये शनिवार नंगानाच, अश्लीलता आणि इंटिमेंट सीन पहायला मिळाले. एवढेच नाही तर संवादामध्ये देखील अश्लील आणि द्विअर्थी शब्द प्रेक्षकांना एेकायला मिळाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांमध्ये बसलेल्या लहान मुलांसमोरच हे सगळे काही बिनदिक्कतपण दोन तास सुरु राहिले. मुलांना ना गेटवर रोकले गेले ना कोणत्या पोस्टरवर किंवा तिकिटावर या नाटकातील अश्लील दृश्य आणि संवादांबद्दल माहिती दिली गेली. ड्रीम सिक्वेंसच्या माध्यमातून दाखवले सीन...

    अश्लीलतेची हद्द तर तेव्हा झाली जेव्हा प्रेक्षकांतील तरुण तरुणींनी माना खाली घातल्या तर आपल्या फॅमिली सोबत आलेले लोक उठून गेले. जेकेके मध्ये नवरस आयोजनाअतर्गंत 'ख्वाब सा' या नाटकाचा प्रयोग ठेवण्यात आला होता. अतुल कुमार यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक शेक्सपिअरच्या प्ले ए मीड समर नाईट्स ड्रीम वर आधारीत होते. हया नाटकातील सीन ड्रीम सिक्वेंसच्या माध्यमातून दाखवले गेले. यामध्ये प्रेमाचे एक वेगळे स्वरुप आणि मुर्खतापूर्ण दृष्टिकोणातून देखील दाखवण्यात आले. जेकेकेच्या अॅडिशनल डीजी टेक्निकल अनुराधा सिंग देखील प्रेक्षकांमध्ये बसलेल्या होत्या


    अश्लीलतेवर शिष्टाचाराचा पडदा
    दिव्य मराठी कडे असे काही फोटोज आहेत ज्यात अश्लिलतेच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. नाटक पाहून धक्का बसलेल्या पालकांचे आणि मुलांचे देखील फोटोज आहेत पण संवेदनशीलता लक्षात घेऊन ते प्रकाशित केले नाहीत. जे फोटो प्रकाशित करत आहोत त्यावरही शालीनतेसाठी पडदा टाकण्यात आला आहे.

  • off scenes staging in a front of children

Trending