आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BJP आमदाराने टोल कर्मचा-याला केली मारहाण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर. राजस्थानमधील बासवाडा जिल्ह्यातील बडालिया भागातील भाजपाच्या एका आमदाराचा टोल कर्मचा-याला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ एका न्यूज एजंसीच्या ट्वीटर हॅंडलर पोस्ट झाल्यानतर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काय आहे प्रकरण.....

 

 

राजस्थानमधील गरही विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितमल कांत यांच्या समर्थकाकडून टोल टॅक्स घेण्यात आला होता. याचा राग आमदारांना आला. ते टोलनाक्यावर आले आणि त्यांनी टोल कर्मचा-याला मारहाण केली त्यावेळी एक व्यक्तीने हा व्हिडिओ आपल्या मोबाईल कैम-यात कैद केला. यानंतर तो सोशल मीडियात व्हायरल झाला. यात स्पष्टपणे दिसतेय की आमदार कांत कर्मचा-याला निर्दयीपणे मारहाण करत आहेत. सध्या या प्रकरणी टोल कर्मचा-याने पोलिसांत तक्रार करण्यास नकार दिला आहे त्याने सांगितले की स्टाफ आणि आमदार यांच्यात गैरसमझ निर्माण झाल्याने हा वाद वाढला. तसेच या प्रकरणी आमदार कांत यांनी देखील बोलण्यास नकार दिला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. 

 

पुढील स्लाइड्सवर पहा टोल कर्मचा-याला आमदाराकडून मारहाणीचे फोटो

बातम्या आणखी आहेत...