राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात मोबाईलवर कॉल करून तुमच्या मुलीच्या चेह-यावर अॅसिड टाकतो अशी धमकी देणा-या रोड रोमिओला मुलीच्या नातेवाईकांनी झाडाला बांधून चोप दिला. मुलीला वारंवार फोन करून यांनतर त्रास दिला तर तुझी पोलिसांमध्ये तक्रार देऊ असा दम मुलिच्या नातेवाईकांनी दिल्यानंतर हा प्रकार घडला.
बहरोड पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिका-याने सांगितले की मुंडवारा दरबारपूरचा रमेश चंद नावाचा मुलगा मोबाईलवरून इंद्रा कॉलनीतील मुलीला वारंवार फोन करून त्रास देत होता. हा प्रकार मुलीने आई-वडीलांना सांगितला. यानंतर परत फोन केला तर तुझ्या विरोधात गुन्हा नोंदवला जाईल असा इशारा मुलीच्या नातेवाईकांनी दिला. माझ्या विरोधात तक्रार केली तर तुमच्या मुलीच्या चेह-यावर अॅसीड टाकतो अशी धमकी मुलाने दिली. या धमकीनंतर मुलीच्या परिवारातील लोकांनी मुलाला झाडाला बांधून चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलाला सार्वजनिक चोप देत असताना याठिकाणी मोठी गर्दी झाली होती.
पुढील स्लाईडवर पाहा रोमिओला चोप देतानाची फोटो...