(फोटो: डान्स पार्टी दरम्यान तरूणींनी केले फोटो सेशन)
जयपूर - कॉलेजचे जुने कॅम्पस, जुने मित्र आणि मस्त डान्स पार्टी असे सर्वांनाच हवे हवेसे वाटते. असाच काही प्रसंग जयपूरच्या द आय आय एस विद्यापीठात पाहायला मिळाला. येथे 'बंधन - डान्स पार्टी' नावाने
आपल्या माजी विद्यार्थ्यांसाठी एका डान्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत विद्यार्थीनींनी डीजेच्या गाण्यांवर आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवत डान्स केला. या मस्तीसोबतच शॉपिंग आणि फुड स्टॉल्सचाही आनंदही या विद्यार्थ्यांनी घेतला.
दरवर्षी होणार्या या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक असे रंगमंच खुले करून देणे ज्यामुळे त्यांची एकमेकांशी चांगली ओळख होईल. तसेच ते भविष्यात एकमेकांच्या कामास येतील. या समारोहात जवळपास 600 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
पुढील स्लाईडवर पाहा, नृत्यामध्ये गुंग झालेल्या सौंदर्यवान तरूणी