आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Woman Run For 5 KM During Pregnancy For Police Job

हवालदार होण्यासाठी 34 मिनिटांत 5 किमी धावली 8 महिन्यांची प्रेग्नंट सुमन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हनुमानगड (राजस्थान)- पोलिस भरतीच्या वेळी आठ महिन्यांची प्रेग्नंट असलेल्या एका महिलेने चक्क 34 मिनिटांत 5 किमी धावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. विशेष म्हणजे धावण्याची स्पर्धा पूर्ण करण्यासाठी 35 मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. दरम्यान, यावरुन जगण्याची लढाई किती तीव्र झाली आहे हेही अधोरेखित झाले आहे. सरकारी नोकरी मिळावी यासाठी आपल्या देशात प्रसुतीला अगदी काही महिने शिल्लक असताना प्रेग्नंट महिलेला चक्क पाच किलोमीटर धावावे लागले यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट नाही.
सुमनचे सर्वांनीच केले कौतुक
धावण्याच्या शर्यतीत सुमनने शारीरिक फिट असलेल्या अनेक मुलींना मागे टाकले. प्रेग्नंट असताना ती जराही खचली नाही. शारीरिक कमीही पडली नाही. स्पर्धा पूर्ण झाल्यावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तिने तोंड भरुन कौतूक केले. त्यानंतर सुमन म्हणाली, की या परिस्थितीत स्पर्धा पूर्ण करणे हे माझ्यासमोर एक मोठे आव्हान होते. पण करिअरचा विचार करताना हे आवश्यक होते. यावेळी माझे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. त्यांनी माझा उत्साह वाढवला.
दडपण होते पण आत्मविश्वास मजबूत होता
सुमन म्हणाली, की मी जुन 2014 मध्ये हवालदारपदासाठी लेखी परिक्षा दिली होती. त्याचा निकाल जानेवारी 2015 मध्ये आला. मी पास झाली होती. याचा आनंद झाला. पण दोन महिन्यांनी फिजिकल इजिबिलिटी टेस्ट होती. यावेळी माझ्या प्रेग्नंसीचा आठवा महिना होता. पण माझा स्वतःवर पूर्ण विश्वास होता. त्यासाठी मी डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यांनी मला परवानगी दिली. माझ्यासोबत धावत असलेल्या सर्वसाधारण प्रकृतीच्या मुली मध्येच बसून गेल्या होत्या. पण मी हरली नाही.
सुमनची डॉक्टर शिप्रा शर्मा म्हणाली, की सुमन खुप खंबीर मुलगी आहे. तिच्यातील उत्साह बघून मी तिला स्पर्धेत भाग घेण्यापासून रोखले नाही. या परिस्थितीत धावण्यात काही जोखीम नाही. पण जर पाय घसरला किंवा ती पडली तर मोठा धोका होण्याची शक्यता असते.
सुमनचे वडील पतराम बीएलएफमध्ये होते. तिचे सासरे राजवीरसिंह पूनिया जेलर आहेत. पती प्रदीप कुमार हेही पोलिसाची नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.