आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajmer Police Busted Sex Racket Cum Rave Party At Farm House

अजमेरमध्ये सेक्स रॅकेटचा भांडाफोड, जयपूरमधून आणल्या होत्या हायप्रोफाईल कॉलगर्ल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजमेर (राजस्थान)- येथील फॉयसागर रोडवरील फार्म हाऊसवर काल (सोमवार) धाड टाकून पोलिसांनी सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. पोलिसांनी आठ युवती आणि नऊ श्रीमंत तरुणांना अटक करुन न्यायालयात सादर केले. न्यायालयाने सर्व आरोपींना 16 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली.
गोयल फार्म हाऊसचे मालक आनंद गोयल यांनी प्रॉपर्टी व्यवसायात कोट्यवधी रुपयांचा नफा झाल्याच्या आनंदात शराब-शबाब पार्टी आयोजित केली होती. शहरातील श्रीमंतांसोबत चांगले संबंध राहावेत यासाठी अशी पार्टी ठेवण्यात आली होती. पण पोलिसांनी धाड टाकून हायप्रोफाईल कॉलगर्ल आणि श्रीमंत तरुणांना अटक केली.
जयपूरमधून मागवल्या होत्या कॉलगर्ल
आनंद गोयल यांच्या फार्महाऊसवर असलेल्या पार्टीसाठी जयपूर येथून हायप्रोफाईल कॉलगर्ल मागविण्यात आल्या होत्या. मुद्दाम रात्रीच्या वेळी पार्टी ठेवण्यात आली होती. फार्म हाऊसच्या हॉलमध्ये डान्स बारही उघडण्यात आला होता. यावेळी गोळा झालेले श्रीमंत तरुणी या तरुणींवर लाखो रुपये उधळत होते. दुसरीकडे फार्म हाऊसच्या खोल्यांमध्ये देहव्यापार सुरु होता.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या घटनेशी संबंधित फोटो....