आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नटिळ्यात वधूपित्यास परत केले 8 लाख रुपये, 2 बाइक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धोलपूर (राजस्थान) - राजस्थानातील धोलपूर जिल्ह्यात बाडीजवळील हांसई गावात मीणा समाजातील दोन भावांनी गुरुवारी संध्याकाळी लग्नटिळ्याच्या दिवशी हुंड्यासाठी दिलेले ८ लाख रुपये आणि दोन बाइक वधूपित्यास परत केले. त्यांचा हा निर्णय ऐकून समाजातील लाेकांना धक्काच बसला.
 
याच मंडळींनी या दोन भावांचे अभिनंदन करून त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. या दोन भावांची नावे, विजयसिंग मीणा आणि बिजेंद्रसिंग मीणा अशी आहेत. हे दोघेही रेल्वे विभागात नोकरीस आहेत. या तरुणांनी सासूरवाडीच्या लोकांना सांगितले, तुमची मुलगी आमच्यासाठी सर्वात मौल्यवान असा हुंडा आहे. आम्ही संत रामलाल महाराजांचे अनुयायी आहोत.
 
यामुळे त्यांनी दिलेल्या संस्कारानुसार कोणाकडून हुंडा घेणार नाही आणि कोणाला देणार नाही, असे सांगितले. असे गुणवान आणि प्रामाणिक जावई मिळाल्याबद्दल या निर्णयाचे वधूपित्यांनी स्वागत केले.  वधूपक्षात आनंद पसरला होता. 
 
दोघी जावा सख्ख्या बहिणी 
 हांसई गावातील विजय आणि बिजेंद्र यांचे लग्न २७ फेब्रुवारीस मुरेनाजवळील बामोर गावात होणार आहे. या दोन सख्ख्या भावाचे लग्न ज्या मुलींशी होत आहे. त्या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. मुरेना गावातील या मुलींचे पिताही रेल्वेत नोकरीस आहेत.
बातम्या आणखी आहेत...