आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram Bapu Was Brought From Jodhpur To Delhi For Medical Tests

PHOTOS: रेल्वेत आसारामचे भजन-किर्तन, केला डान्स, बघण्यासाठी भाविक चढले छतावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर (राजस्थान)- गुरुकुलातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जोधपुरच्या सेंट्रल जेलमध्ये असलेल्या आसाराम बापुला उपचारासाठी दिल्लीला आणण्यात आले. यावेळी ट्रेनमध्ये आसारामने भजन-किर्तन म्हटले आणि सोबत डान्सही केला.
त्याला दिल्लीच्या एम्समध्ये जेव्हा नेण्यात आले तेव्हा त्याने उपचाराला नकार दिला. माझी प्रकृती अगदी ठणठणीत आहे, असे सांगितले. अखेर डॉक्टरांनी बळजबरीने उपचार केले. दरम्यान, दिल्लाला नेत असताना आसारामला बघण्यासाठी भाविक अगदी छतावर चढले. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केल्याने पोलिस बंदोबस्त ठेवावा लागला.
ट्रायजेमिनल न्युरोल्जियासंदर्भात आसारामवर उपचार सुरु आहेत. दिल्ली रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर त्याला सरळ तिहार तुरुंगात नेण्यात आले. यावेळी आसाराम जोधपुर पोलिस टीमला म्हणाला, की मी तिहारमध्ये प्रवचन आणि सत्संग करण्याचे स्वप्न बघितले होते. माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. यासाठी तुम्ही माझी मदत केली आहे. मी तुमचा आभारी आहे.
अशी झाली बळजबरी आरोग्य चाचणी
एम्सच्या जयप्रकाश नारायण ट्रॉमा सेंटरमध्ये आसाराम बापुवर उपचार करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी काही चाचण्या करण्यास सांगितल्या. त्यावर आसारामने आक्षेप घेतला. मी अगदी बरा आहे. मला काहीही झालेले नाही, असे तो म्हणाला. परंतु, डॉक्टरांनी बळजबरी काही चाचण्या केल्या. त्यानंतर आसारामचा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता.
पुढील स्लाईडवर बघा, आसारामला बघण्यासाठी जोधपुर स्टेशनवर उसळलेली भाविकांची गर्दी.... त्याला बघण्यासाठी छतावर चढले भाविक...