आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीडियाच्‍या प्रश्‍नांवर आसाराम हसले, म्‍हणाले - शांत राहा, निर्दोष मुक्‍तता निश्‍चित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी 1 डिसेंबर 2013 पासून जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये आसाराम बापू तुरुंगवास भोगत आहेत. आसाराम बापूंची निर्दोष मुक्‍तता व्‍हावी यासाठी भाजप नेता सुब्रमण्यम स्वामी जामीन मिळवण्‍याच्‍या प्रयत्‍नात आहेत. त्‍यानंतर आपली निर्दोष मुक्‍तता होणार आहे, असा विश्वास आसाराम बापूंना आहे. या विश्‍वासामुळे मंगळवारी त्‍यांची बॉडी लँग्वेजही बदललेली दिसली.
कोणत्‍या प्रश्‍नावर हसले आसाराम...
- जोधपूर जिल्‍हा न्‍यायालयात नियमीत सुनावणीनंतर आसाराम बापू तुरुंगात जात होते. तेव्‍हा माध्‍यमांनी त्‍यांना काही प्रश्‍न विचारले.
प्रश्‍न - तुम्‍हाला असे वाटते का की, जामीन मिळेल?
उत्‍तर - (काही वेळ गालातल्या गालात हसत)- निर्दोष मुक्‍तता होणारच आहे.
- दोन दिवसानंतर जामीन मंजुरीबाबत होणा-या निर्णयावर प्रश्‍न विचारला असता त्‍यांनी दोन्‍ही हातांच्‍या बोटांनी शांत राहण्‍याचा इशारा केला.
- वाहनात बसल्‍यावर आसाराम म्‍हणाले की, प्रत्येक परिस्थितीत शांत राहा.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, सुनावणीसाठी न्‍यायालयात आलेल्‍या आसाराम बापूंचे फोटो...