Home | National | Rajasthan | Bhaskar festival news anchor arnav Goswami

स्टार अॅंकर अर्णव गोस्वामी या चॅनलमध्ये करणार काम, म्हणाले- या देशात ओरडावेच लागते

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Dec 22, 2016, 09:59 AM IST

नेशन वांट्स टू नो... मुळे प्रसिद्ध टीव्ही अँकर अर्णब गोस्वामी बुधवारी भास्कर उत्सवात सहभाही झाले. त्यांनी पत्रकारितेतील आपली कथा सांगितली

 • Bhaskar festival news anchor arnav Goswami
  जयपूर - नेशन वांट्स टू नो... मुळे प्रसिद्ध टीव्ही अँकर अर्णव गोस्वामी बुधवारी भास्कर उत्सवात सहभाही झाले. त्यांनी पत्रकारितेतील आपली कथा सांगितली. ते आपल्या चर्चेत का ओरडतात? हेही सांगितले. ते म्हणाले, ‘ या देशात तुम्ही ओरडले नाही तर तुमचा आवाज एेकला जाणार नाही. त्यामुळे ओरडतो.’
  अर्णव म्हणाले, मी राष्ट्रवादी असल्याचा अभिमान आहे. तुम्हाला कोणी भारताचा समर्थक म्हणाले तर त्यात लाज कसली? भारतीय मीडिया राष्ट्रवाद व देशद्रोहात फसलेला आहे. भारतीय मीडियात देशद्रोह्यांना स्थान नाही. मी माझ्या देशासाठी बायस्ड आहे. त्यामुळे भारत- पाकिस्तान मुद्यावर मी तटस्थ होऊ शकत नाही. अर्णवना त्यांचे वय विचारले तेव्हा त्यांनी किस्सा सांगितला. ‘ एकदा राहुल गांधींनी मला माझे वय विचारले. मी म्हणालो, ४०. तर ते म्हणाले,‘ माझ्यापेक्षा छोटे आहात.’ मी उत्तर दिले, ‘हो, पण माझ्याकडे १९ वर्षांचा कामाचा अनुभव आहे.’
  राहुल गांधीशी कठोर व मोदींशी नरमाईची भूमिका का कशी? या प्रश्नावर अर्णव म्हणाले, मोदींची मुलाखत घेता मजा आली. परंतु राहुलना मी फक्त प्रश्न विचारू शकत होतो. उत्तरे तर देऊ शकत नव्हतो.’ अर्णव पुढच्या वर्षी ग्लोबल न्यूज प्लॅटफॉर्म आणत आहेत. चॅनलचे नाव ‘रिपब्लिक’ ठेवले. ते म्हणाले, देशावर विश्वास आहे म्हणूनच चॅनलचे नाव रिपब्लिक ठेवले. चॅनलची नोकरी सोडली की राजीनामा द्यायला लावला? या प्रश्नावर ते म्हणाले, ‘ मी माझे निर्णय स्वत:च घेतो. मला कोणी विकत घेऊ शकत नाही.’
  जुन्या आठवणींना उजाळा देत ते म्हणाले, काम करत असताना अनेकदा धमक्याही मिळाल्या. नोकरीही गमवावी लागेल, असे दरडावले. पण घाबरलो नाही. मी टीव्हीवरून गेल्याचा ज्या लोकांना आनंद झाला, त्यांना पश्चाताप करावा लागेल. मी मुंबईत आपल्या स्टुडिओत बसून स्टोरी ब्रेक करतो. लुटियन्सची दिल्ली देशाच्या पत्रकारितेचे केंद्र होऊ शकत नाही. तेथील पत्रकारितेने देशाला निम्म दाखवले. तडजोडी केल्या. कधीच भ्रष्टाचार उघडकीस आणला नाही.’ अर्णवसोबत सेल्फी व स्वाक्षरीसाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.
  पुढील स्लाईडवर बघा, भास्कर उत्सवाचे फोटो... अर्णव यांनी असे केले मार्गदर्शन... बघा त्यांच्या भाषणाचे व्हिडिओ....

 • Bhaskar festival news anchor arnav Goswami
  उद्घाटन करताना अर्णव गोस्वामी. सोबत भास्कर ग्रुपचे चेयरमन रमेश चंद्र अग्रवाल.
 • Bhaskar festival news anchor arnav Goswami
  जनतेला नमन करताना अर्णव गोस्वामी. सोबत भास्कर ग्रुपचे चेयरमन रमेश चंद्र अग्रवाल.
 • Bhaskar festival news anchor arnav Goswami
 • Bhaskar festival news anchor arnav Goswami
 • Bhaskar festival news anchor arnav Goswami
 • Bhaskar festival news anchor arnav Goswami

Trending