आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयपूरमध्ये रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत आजपासून भास्कर उत्सव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - राजस्थानात दैनिक भास्करला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुरुवारपासून येथे ९ दिवसीय ‘भास्कर उत्सव’आयोजित करण्यात आला आहे. यात कला, संगीत, बिझनेस आिण माध्यम क्षेत्रातील नामांकित लोक सहभागी होत आहेत. पहिल्या दिवशी १५ डिसेंबरला रामदेवबाबा प्रथमच बिझनेस गुरू म्हणून मंचावर येतील. सीतापुरातील जेईसीसी ऑडिटोरियममध्ये पतंजलीच्या यशाचा मंत्र ते सांगतील. सायंकाळी ५ वाजता या कार्यक्रमासाठी निमंत्रितांनाच प्रवेश असेल.

योग गुरू ते बिझनेस गुरू असा प्रवास करणारे रामदेवबाबा प्रथमच एखाद्या व्यासपीठावरून पतंजलीबाबत सविस्तर भाष्य करतील. १०० कोटींहून ५ हजार कोटींची कंपनी बनलेल्या पतंजली कंपनीस देशातील सर्वांत मोठी एफएमसीजी कंपनी करण्याची त्यांची जिद्द कशी आहे हे ते संजय पुगलियांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत सांगतील.

१६ डिसेंबर रोजी संजीव कपूर विविध खाद्यपदार्थ गाण्यांच्या साथीने सादर करतील. लाइव्ह बँडसोबत केलेला संजीव कपूर यांचा हा पहिलाच शो असेल. याच दिवशी सायंकाळी ६ वाजता देशातील प्रसिद्ध अॅड गुरू पीयूष पांडे आपल्या यशाबद्दल सांगतील. जाहिरातीच्या युगात विविध अॅड फिल्म कशा तयार केल्या, ते अनुभव पांडे सांगतील. १७ डिसेंबरला आमिर खान यांचा चित्रपट दिग्दर्शिका फराह खान यांच्यासोबत टॉक शो होईल. दंगल चित्रपटात नवे काय, ९० किलोवरून ६५ किलोवर आणलेले वजन, चित्रपटातील आठवणीत राहणारे क्षण ते सांगतील. १८ डिसेंबरला कवी संमेलन, १९ डिसेंबरला सुफी गायक कैलाश खेर, २० डिसेंबरला सुनिधी चौहान आिण टायगर श्रॉफ यांची म्युझिकल डान्स नाईट होईल. प्रसिद्ध पत्रकार अर्णब गोस्वामी २१ डिसेंबरला प्रथमच जाहीर कार्यक्रमात दिसतील. बातमीचे स्वरूप कसे बदलत चालले आहे हे ते सांगतील. २३ डिसेंबरला १५ हजार मुलांची चित्रकला व स्लोगन स्पर्धा होईल. मिराज ग्रुप या कार्यक्रमाच्या मालिकेचे मुख्य प्रायोजक असून एसबीबीजे व विवो सहप्रायोजक आहेत. बीएसएनएल सादरकर्ता आहे.
बातम्या आणखी आहेत...