आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१५०० लोकवस्तीत पुस्तकांचे भव्य ग्रंथालय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - जैसलमेरस्थित पोखरण फायरिंग रेंजला लागून असलेल्या भादरिया गावात एक अनोखे ग्रंथालय आहे. या गावात दूरदूरपर्यंत रेतीचे ढिगारेच नजरेस पडतात, परंतु संत हरिवंश सिंह यांच्या प्रयत्नाने १९८१ मध्ये स्थापण्यात आलेल्या एका ग्रंथालयामुळे या गावाचे जगभरात नावलौकिक झाले आहे.
गावाची लोकसंख्या फक्त १५०० आहे. मात्र, या ग्रंथालयामुळे देशविदेशातील पर्यटक, संशोधक आणि विद्वानाची गावात रीघ लागली आहे. भादरिया राय मंदिर या प्रसिद्ध शक्तिपीठात सुरू असलेले हे ग्रंथालयात जगदंबा सेवा समितीच्या देखरेखीखाली आहे. टी आकाराच्या या ग्रंथालयात सुमारे १५ हजार फूट लांबीचे कपाट असून यात प्रमुख ७ धर्मांच्या साहित्यांसह विधी, वेद, पुराण, उपनिषदे तसेच सर्व देशांच्या राज्यघटना आहेत.
एका पुस्तकप्रेमी संताचा ध्यास आणि संघर्ष
संत हरिवंश सिंह निर्मल यांना येथे महाविद्यालय व अभिमत विद्यापीठ सुरू करायचे होते. तत्पूर्वी यासाठी त्यांनी अनेक देशांचे दौरे केले. त्याचवेळी त्यांनी जागतिक साहित्य संकलनाचे कार्यही सुरू केले आणि एक लाखापेक्षा अधिक पुस्तके खरेदी केली. पुस्तके घेण्यासाठी ते बर्लिन आणि दिल्लीच्या पुस्तक प्रदर्शनातही जायचे. २०१० मध्ये त्यांचे निधन झाले. हे ग्रंथालय त्यांनी भव्य बनवून टाकले होते. ग्रंथालयाच्या प्रत्येक कपाटावर मोठे दिवे, गॅलरीत झगमगते झुंबर लावून घेतले. स्वच्छतेची फारच काळजी घ्यायचे त्यामुळे येथील फरशा चमकतच राहायच्या. ग्रंथालयाच्या मेंटेनन्सवर दरवर्षी सुमारे ६ ते ७ लाख रुपयांचा खर्च येतो.
व्यापक ग्रंथालय
4,000 लोक एकाच वेळी बसू शकतात.
60,000 - पर्यटक आणि संशोधक दरवर्षी भेट देतात.
562 - कपाटे आहेत. दुर्मिळ साहित्यांच्या मायक्रो सीडीसाठी १८ खोल्या आहेत.