आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेस्थानकावर लावला जाईल बायोगॅस प्लँट, रोज 60 किलो कचरा एकत्र होतो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - शहरातील चार रेल्वेस्थानकांवर जमा होणाऱ्या कचऱ्याचा उपयोग करण्यासाठी उत्तर-पश्चिम रेल्वे पहिल्यांदाच जयपूर जंक्शनवर बायोगॅस संयंत्र प्लँट लावणार आहे. सुमारे ५० लाख रुपये खर्च अपेक्षित असणारा हा प्लँट २ नंबर प्रवेश गेटजवळ कोच केअर काॅम्प्लॅक्समध्ये लावण्यात येणार आहे. प्लँटमध्ये सुरुवातीस प्रत्येक दिवशी सुमारे ५० किलो कचऱ्याचा पुनर्वापर होईल. यातून निर्माण होणारा गॅस रेल्वेमध्ये जेवण बनवणे आणि खत म्हणून पिकांसाठी वापरण्यात येईल. हा प्लँट काॅर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) च्या फंडातून डेव्हलप करण्यात येईल. अशा प्रकारचा बायोगॅस प्लँट डेहराडूनमध्ये झालेला असून तेथे प्रत्येक दिवशी १ टन कचऱ्याचा पुनर्वापर होत आहे.

डीआरएम अंजली गोयल यांनी सांगितले की, प्लँटसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. त्या जानेवारीपर्यंत निकाली काढण्यात येतील. चार महिन्यांनंतर प्लँट सुरू होईल. बायोगॅस निर्मितीसाठी उपयोगी पडणाऱ्या कच्च्या कचऱ्यात वाढ झाल्यानंतर प्लँटची क्षमता वाढवण्यात येईल.
४० किलो प्लास्टिक
दुर्गापुरा, जयपूर जंक्शन, जगतपुरा, गांधीनगरसह चार रेल्वेस्थानकांवर रोजच सुमारे ६० किलो कचरा जमा होतो. यात ४० किलोपेक्षा अधिक प्लास्टिक आहे. प्लँटद्वारे प्लास्टिक कचऱ्याच्या किमतीत वाढ होऊ शकते. सध्या शहरात प्लास्टिक कचरा १० रुपये किलो विकत आहे.