आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाराम म्‍हणतो माझ्या विरोधातील प्रकरण बोगस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर । लैंगिक अत्‍याचाराच्‍या आरोपात दिड वर्षांपासून जोधपूरच्‍या तुरूंगात बंद असलेल्‍या आसाराम बापूने म्‍हटले आहे की, आपल्‍या विरोधातील प्रकरण हे बोगस आहे. काही दिवसातच ते सिद्ध होईल. या प्रकरणातील साक्षीदार सुधा पाठक बुधवारी कडक सुरक्षेत आपले स्‍टेटमेंट देण्‍यासाठी न्‍यायालयात दाखल झाल्‍या होत्‍या. सुधाने आपल्‍या बाजूने बयान दिले आहे अशी माहिती न्‍यायालयातून बाहेर पडताना आसारामने दिली आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी अलिकडेच या प्रकरणाला बोगस म्‍हटले आहे यासंदर्भात विचारले असता आसारामने म्‍हटले की, खरोखर आपल्‍या विरोधात बाेगस प्रकरण सुरू आहे. असे होऊच कसे शकते की, दोन हजार किलोमीटर अंतरावरून कोणी दुसरी मुलगी आपल्‍या आई वडिलांना घेऊन येते आणि कोणावरही आरोप लावते. मात्र, पुढील काही दिवसात सिद्ध होईल की, हे प्रकरण साफ बोगस आहे. याबाबतअलिकडेच सुब्रमण्‍यम स्‍वामी यांनी ट्वीट करून गृहमंत्री
राजनाथ सिंह यांना माहिती दिली होती.
कडक सुरक्षेत सुधा न्‍यायालयात
आसाराम प्रकरणातील महत्‍त्‍वपूर्ण साक्षीदार सुधा पाठक यांना कडक सुरक्षा बंदोबस्तात न्यायालयात दाखल करण्यात आले. दोन्‍ही पक्षांच्‍या वकीलांनी त्‍यांची 'क्रॉस चेकिंग' केली. तेव्‍हा सुधाने आपल्‍या बाजूने बयान दिल्‍याची माहिती न्‍यायालयातून बाहेर आल्‍यावर आसारामने दिली. मात्र यासंदर्भात आताच काही बोलणे योग्‍य होणार नाही असे सरकारी वकिलांचे मत होते. विशेष हे की, सुधा पाठक यांनी बयान देण्‍यासाठी व जोधपूरला येण्‍यासाठी कडक सुरक्षेची मागणी केली होती. त्‍यानंतर न्‍यायालयाने पोलिसांना सुरक्षा पुरवण्‍यासंदर्भात आदेश दिले.
अन्‍य फोटो पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करा..