प्रेयसीचे घर बांधण्यासाठी स्वत:चे घर लुटणा-या प्रियकरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 22.35 लाख रूपये चोरीला गेल्याची तक्रार करणा-या प्रियकराला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्हा कबुल केला आहे.
बंदुकीचा धाक दाखवून माझे 22.35 लाख रूपये लुटल्याची तक्रार करणा-या accountant चा बनाव पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमे-याच्या मतदीने उघडकीस आणला. डीएसपी हिमांशु यांनी सांगितले की, आरोपी ज्ञानचंद जैन याने 22.35 लाख रूपये चोरी गेल्याची तक्रार केली. मात्र सीसीटीव्ही कॅमे-यातील वेळ आणि जैन याने सांगितलेला वेळ मॅच होत नसल्यामुळे काय प्रकार आहे तो लक्षात आला.
जैन याने प्रेयसीला विज्ञान नगरमध्ये दिले 11. 35 लाख रूपये-
अनंतपुरातील पोलिस अधिका-याने सांगितले की, जानेवारी 2013 पासून ज्ञानचंद जैन याचे अफेयर चालू होते. जैनची प्रेयसी हीनाने घर बांधण्याचा हट्ट धरला. प्रेयसील घर बांधण्यासाठी लागणारी मोठी रक्कम जैन याला एकत्र करणे शक्य नसल्यामुळे घरातील पैसे चोरण्याचा निर्णय जैन याने घेतला. चोरीचे पैसे जैन यानेच प्रेयसीला विज्ञान नगरमध्ये दिले.
पुढील स्लाईडव पाहा आरोपीचा फोटो...