जोधपूर - पंजाब पोलिसांनी शनिवारी सकाळी श्रीगंगानगर जिल्ह्यातील रायसिंह नगरमधून एक आरोपी ताब्यात घेतला आहे. पोलिस या आरोपीची चौकशी करत आहेत.
जाणून घ्या, कधी पासून होते जवानावर लक्ष ...
- अनिल भगत नावाचा जवान बीएसएफच्या 52व्या बटालियनमध्ये तैनात होता.
- गुप्तचर विभागाचे मागील एक महिन्यापासून या जवानावर लक्ष आहे.
- गुप्तचर विभागाला शंका आहे की, या जवानाने सिमेवर काम करताना गुप्त माहिती पाकिस्तानात पाठवली असावी.
काय म्हणाले पोलिस?
- काही दिवसांपासून या जवानाच्या मोबाइलवर पाळत ठेवण्यात येत होती.
- पाक एजेंटसोबत या जवानाचा संकर्प झाल्याचेही उघड झाले आहे.
- जवानाच्या मोबाइलचे सर्व रेकॉर्ड पोलिसांच्या हाती लागले आहे.
- पोलिसांच्या माहितीनुसार, अनिल ड्रग स्मगलर गुरजंट सिंह उर्फ भोलू याला मदत करत होता.
- मोहालीचे एसएसपी गुरप्रीत सिंह भुल्लर यांच्या मतानुसार, हे दोघे फेसबुक आणि व्हॉट्स अॅपव्दारे एकमेकांच्या संपर्कात होते.
- पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सिंगल डिलिव्हरीसाठी 40,000 ते 50,000 हजार रुपये घेत होता.
- पोलिसांनी असेही सांगितले की, गुरजंट आणि जवानाची एका लग्न सोहळ्यात भेट झाली होती.